04/03/17, 11:32 PM - Sandesh Nayak: वयाचं प्रेम....
लोकांना काय जातंय,
उगाच नावं ठेवायला?
आपल्या जोडीदाराचं महत्व
असतं ज्याला त्याला.
विशीतलं प्रेम,
कसं आसुसलेलं असतं
संधी मिळताच एकमेकाला,
भेटायला धावतं
तिशीतलं प्रेम,
थोडं थोडं स्थिरावतं
आपल्याबरोबर संसाराचा पण,
विचार करु लागतं
चाळिशीत मात्र,
थोडंसं वेगळं घडू लागतं
दुसरीकडे मन रिझतंय का,
शोध घेऊ लागतं
पन्नाशीमध्ये ज्याला त्याला,
पुरतं कळून चुकतं
जोडीदाराशिवाय तरणोपाय नाही,
मनापासून पटतं
साठीच्या प्रेमाला सुरु होते,
काळजीची किनार
एकमेकांच्या तब्बेती जपताना,
होतो प्रश्नांचा भडीमार
सत्तरीतलं प्रेम हळुहळू
अलिप्त होऊ लागतं
आपण आहोत एकमेकाला,
या दिलाशातच रमतं
ऎंशीच्या घरातलं प्रेम,
त्यागाची परिसीमा गाठतं
आपल्या आधी जोडीदाराला,
बाथरुममध्ये धाडतं!
यापुढचा विचार,
मी करु शकत नाही
कारण कल्पनेतही माझं वय,
तेवढं होत नाही!
*******
Dedicated to all *beautiful, loving*👬 & *caring Couples*👏👏
Comments
Post a Comment