01/04/17, 3:19 AM - Mohan jagdale: माह्या बायकोनंच मले एप्रिल फुल बनोलं राजेहो
🎉कानाले... खडा..!!🙄
काल माह्या वाट्स अपवर आली राजेहो...
इतली ..सनान...परी...!
का घंटाक भर पाह्यतच रायलो..
बायको.. नव्हतीना...घरी...!!
असं वाटे गुलाबाचं नरम नरम
टाकलं हाय...म्याटिंग...
अन पुसुच नका गुलकंदा वानी
सुरु झाली ...चाटिंग..!!
म्हने, पायटी तुमी फिराले जाता..
मी रोज तुमाले पाह्यतो..
मंग सारा दिस तुम्हाले
मी हरदम आठवत..राह्यतो..!!
मले लयच आवडले तुमचे वाले
कुरये केस उली ..उली..
फक्त तिसचीच हाव मी..
माह्य..नाव हाय.."जुली"...!!
लय दिसापासून तुम्ही
मनात हाय हो माह्या...
तुम्हीच माह्ये गुलाब जामुंन..
बाकीचे .फुटाणे अन लाह्या!!!
बम हरीख झाला मले राजेहो..
बम लागलो नाचाले..!
येक येक शबुद तिचा..
दहा डाव लागलो वाचाले...!!
म्हने ..घरी फकस्त बुढाच असते
थ्याले बिलकुल नका भेजा..!
बरोबर सहाच वाजता सख्या..
तुम्ही घरी माह्या येजा...!!
अरे नाचाचच मन करे सांजीले
मस्त तैयार झालो..
कइक दिवसाच्या बासता..
मी थ्या रोजीच.. न्हालों...!!
जसा निंगालो तस्साच राजेहो
माह्या घरचीनं धरला..हात..!
माह्या फुटक्या तकदिरानं..
नीरा केलता माह्या घात..!!
म्हने, बसा घरात उगे मुगे ..
जराशी शरम वाटत नाई...
अहो बिस्कुटावानी बादच मुरता..
गोड बोलली ..जराशी बाई..?
इतली साजरी बायको तुम्हाले ..
अन बादच पडली भूल..!
मीच हावथे .येलपाडी "जुली"..!
तुम्हाले..केलं म्याच "एप्रिल फुल"!!!!
तवा पासून राजेहो मी शिकलो
साजरा धडा..!
का अप्सरा बी आली त .."ताईच"
म्हनन..
आता कानाले लावला खडा..!!!🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
Comments
Post a Comment