तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तुत्व करेल त्याच कर्तुत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते. कारण ह्या वयात मुले हुशार असतात matured असतात.तरुण रक्त अंगात सळसळते. ह्या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त होवून ह्या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात *नामस्मरण* करायचे असते.म्हातारपणी **नामस्मरण** होत नाही कारण त्यांनी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालविलेले असते. त्यामुळे त्यांच्या कडून *नामस्मरण* झाले तरीही ते देवाला पोहचते. पण दैवीशक्ति त्यांना मिळत नाही. तर ही शक्ती तरुण वयातच मनुष्याला मिळते. *नामस्मरण* हे तरुंणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृत असते.त्या *नामस्मरणाच्या* अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ती मिळते.नामस्मरण का कारायचे असते? कारण तरूण वय हे अल्लड़ असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते मग त्या मनाला व विचारांना स्थिर फक्त *नामस्मरणचं* करते.त्यांना ह्या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधी फसवेल, कधी घात करेल किंवा जीवनात कधी मृत्यु येईल हे सांगता येत नाही. पण *नामस्मरनाने* खुप काही समस्या जीवनात सुटु शकतात. हल्लीच्या मुलांना नेट,टीव्ही, मोबाइल ह्याचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नाही. सतत तेच तेच जीवन जगल्यामुळे मुलांच्या मनात वाइट विचार येतात. बारीक सारिक गोष्टींवरून चिड़तात. लगेच राग येतो काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुसर्यांचा घात करतात. पैशांसाठी व्याभिचार करतात. पैसा श्रेष्ठ आहे संस्कार कमी आहेत अशी ह्यांची विचारसरणी असते. त्यात त्या स्पर्धा परीक्षा स्वताच्या आत्म्याला व शरीराला त्या परीक्षेत सतत गुंतवून ठेवले असल्यामुळे त्यांना जीवन हे नीरस वाटते. दुसर्यांच्या पुढे जाने खुप पैसा कमविणे हेच ह्यांचे ध्येय असते.पण मन ह्या सुखवस्तु मिळाल्यामुळे विचलीत होवून काही वेळेला मुले वाम मार्गाला जातात. कारण वाम मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे. ह्या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात *नामस्मरण* करायचे असते. *नामस्मरनाने* एक वेगळीच दैवीशक्ती प्राप्त होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले सर्व लक्षात राहते. वाइट कर्म करायला मन त्या मुलांचे घाबरते. कारण मनात नामाची माळ जपली जाते.तरूण मुले वाइट कर्म करत नाही त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही. म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. *नामस्मरणामुळे* खुप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जस जसेनामस्मरण वाढते तस तसे दैवी शक्ती वाढते. त्यामुळे त्यांना जीवनात कितीही वाईट प्रसंग आला कि देव त्यांचे रक्षण करतो. त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते. देवाचे संरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते. चेहर्यावर makeup ची गरज भासत नाही.तर आपोआप तेज येते. तरुण मुले आणखी सूंदर दिसू लागतात. ईश्वरी अंश त्यांच्यात तयार होतो.चिंता भय ह्याची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतलेली असते.देवालाही सूंदर ताजे फुल आवडते म्हणजेच तरुण काळा असो या गोरा पण त्याचे सूंदर निष्पाप मन देवाला आवडते. म्हणून तरुण वयात *नामस्मरण* करायचे असते. म्हातारपण आता कोणी पाहिले आहे. मृत्यु कधी येईल सांगू शकत नाही आज मी लेख लिहीतो उद्या तुम्हाला दिसेन की नाही सांगू शकत नाही. म्हणून देवाचे दिवसातून एकदातरी *नामस्मरण* करा कारण जीवनातले खरे अमृत तेच आहे.🙏👏🌺🙏
*तरुण वयात नामस्मरण का करावे ...?*
Comments
Post a Comment