Skip to main content

Wild imagination पदार्थांचे..

कॉलेज मधे असताना मैत्रिणी बरोबर ET ( Extra Terrestrial) नावाचा एक इंग्रजी सिनेमा पाहायला गेलो, खूप काही भव्यदिव्य अनाकलनीय पडद्या वर दीड तास पाहून बाहेर पडलो, एका वेगळ्याच विश्वात जाऊन परत आल्याचा साक्षात्कार झाला..त्यावेळी माझी मैत्रीण म्हणाली, "Americans really have a wild imagination! ". हे वाक्य माझ्या मनात कायम घर करून राहिले. आणि याची प्रचिती मला आमच्या ३ वर्षाच्या US वास्तवात; या प्रसंगाच्या तब्बल २५ वर्षा नंतर आली. ज्यावेळी आपण अगदी साधेसुधे विषय हाताळत होतो, त्यावेळी Americans,  ET सारखे विषय घेऊन सिनेमा बनवत.. आता सिनेमा आणि पदार्थ याचा काय संबंध असे वाटणे आपल्याला साहजिकच आहे. पण आज मीही असेच 'wild imagination' केले आणि हे - हे जिन्नस घातले तर होणारा पदार्थाची चव कशी लागेल, याचा अंदाज बांधला आणि मग तो कृतीत आणला..म्हणून तर कॉलेज मध्ये असताना पाहिलेल्या सिनेमा ची आठवण येथे सांगाविशी वाटली..
त्याचे असे झाले, करोना च्या साथीमुळे अनेक सल्ले आपसुक पहायला आणि ऐकायला मिळाले..काय करा आणि काय करू नका..एक ना दोन..

त्यात एका केरळी डॉक्टरांची मुलाखत ऐकली. त्यांच्या मते, फळापेक्षा बियात जास्त खनिजे असतात, तेव्हा फळां बरोबर बिया पण खा! विषेतः पपयी आणि कलिंगड..झाले तेव्हा पासून नवा उद्योग मागे लागला..

कलिंगडाचा सिझन संपलाच होता, त्यामुळे छोटी कलिंगडेच बाजारात मिळत होती, त्याच्या बिया पण तसल्याच छोट्या असल्यामुळे फोडीबरोबर खाल्या गेल्या, पण पपईच्या कश्या खाणार? त्या धुवून वाळवून रोज १-२ खायच्या असे ठरले..

घरात रोजच फळे येतात, त्यामुळे बियांचे प्रमाण वाढले, कसे आणि कधी खायच्या येवढ्या बिया, अश्या विचारात असतानाच, घरी केलेली लसणाची कोरडी चटणी संपली..मग काय? मीही माझे wild imagination वापरून एक कोरडी चटणी केली..नामकरण आता तुम्हीच करा बाई!

अर्धी वाटी  लाल भोपळ्याच्या बिया
एक मोठा चमचा द्राक्षाच्या बिया
अर्धी वाटी पपईच्या बिया
एक वाटी शेंगदाणे
२ चमचे तीळ ( मी काळे तीळ घेतले)
२ चमचे लाल तिखट
१ चमचा मीठ
१ चमचा मोहरीचे तेल ( मोहरी ही चालेल)

सर्व यथावकाश एक एक करून खमंग भाजले आणि अगोदर सर्व बिया बारीक मिक्सी वर दळून घेतले, नंतर शेंगदाणे, तीळ, तिखट, मीठ सर्व एकत्र त्यावर घालून बारीक दळले. पण मिक्सी मध्ये चटणीचा भुगा होतो म्हणून चमचाभर मोहरीचे तेल टाकून परत एकदा फिरवले, त्यामुळे चटणीचा छान गोळा झाला आणि चटणी तयार ! मग थोडी चव घेऊन पाहिली.. आहाहा.. एकदम अप्रतिम खमंग बघा तुम्हाला पटली तर करून पहा..

तळ टिप: हा बिया खाण्याचा खटाटोप येव्हढ्याच करिता, कारण यात असलेली खनिजाचा ( minerals) मुळे आपली रोग प्रतिकार शक्ती भरपूर वाढते.

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...