*आज गुरुपौर्णिमा आहे त्यावर लिहिण्या चा प्रयास*
*प्रथम आपण गुरुपौर्णिमा याचा अर्थ पाहू पौर्णिमा म्हणजे चंद्राचा पूर्ण उदय म्हणजे प्रतिपदे पासुन ते चतुर्दशी या तिथींचे विलीनीकरण म्हणजेच चंद्राचा पूर्ण उदय कसे सोळा कलानी चंद्राचे अस्तित्व असणे कला म्हणजे ब्रम्हाची शक्ती*
*आता आपण सोळा कला कोणत्या त्या पाहु कामकर्षणी बुध्या कर्षणी अहंकार कर्षणी शब्दा कर्षणी स्पर्शा कर्षणी रूपा कर्षणी रसाकर्षणी गंधाकर्षणी चित्ता कर्षणी धैर्या कर्षणी स्म्रुत्या कर्षणी नामा कर्षणी बिजा कर्षणी आत्मा कर्षिणी अमृता कर्षणी शरीरा कर्षणी*
*आता चंद्राच्या कला म्हणजे शक्ती आणि आषाढी पौर्णिमेलाच गुरू पौर्णिमा येते त्याचे कारण चंद्र म्हणजे मनाचे प्रतीक आहे आणि मन हे चंचल आहे कारण चंद्र हा पौर्णिमेस पूर्ण खिलतो म्हणजे स्थिर होतो व परत प्रतिपदे पासून क्षीण होतो तो थेट आमव्यसा पर्यंत तसेच मनाचे आहे कधी स्थिर तर कधी चंचल*
*दोन आयन असतात उत्तरायण व दक्षिणायन उत्तराण्यायात तुम्ही साधना करतात त्यामुळे तुमची प्रगती होते व दक्षिणायनात साधना करतात त्यामुळे तुमची पाप कर्मे क्षीण होतात*
*आषाढी पूर्णिमे पासून संन्याशी लोकांचा चातुर्मास चालू होतो तो थेट भाद्रपद पूर्णिमेस संपूर्ण होतो आणि त्यामुळे त्याचे वास्तव्य एकाच जागी असते म्हणजे स्थिरीता असते एरवी संन्याशी 3 रात्रीच कुठे पण वास्तव्य करतात*
*कारण संन्यासी हे अद्वैईत म्हणजे समत्वाचे व ज्ञानाचे प्रतीक आहे*
*सूर्य हे आत्म्याचे प्रतीक आहे त्यामुळे सुर्यात कोणताही फेरफार होत नाही*
*आता आपण कला म्हणजे काय ते पाहू 16 कलानी चंद्रचा उदय फक्त पौर्णिमेला होतो म्हणजेच चेतनेची जे स्थर आहेत त्याची तुलना चंद्राच्या 16 कला बरोबर होते 1 ते 2 कला वनस्पतींच्या 3 ते 4 कला पशु पक्षी 5 ते 6 अल्पमती असलेले मानव 7 ते 8 कला बुद्धीचा विकास झालेली माणसे 9 वी कला संत पुरुष व 10 पासून ते 16 कला दिव्य अवतारी पुरुष आणि त्यामुळेच ते दिव्यकांतीमान तेजस्वी व दिव्य वाणीचे असतात*
*आणि त्याचे प्रतीक म्हणजे दशावतार*
*मस्त्य 1 कूर्म 2 वराह 4 नृसिंह 6 वामान 8 परशुराम 10 श्रीराम 12 श्रीकृष्ण 16 गौतम बुद्ध 14 आणि कल्की अवतार आजुन व्हायचा आहे*
*आणि म्हणूनच श्रीकृष्णांना म्हणतात कृष्णम वंद्ये जगद्गुरुम आणि स्वतः श्रीकृष्ण पण म्हणतात जो परब्रह्म परमेश्वर आहे तो मी स्वतःच आहे*
*आपण आषाढी पूर्णिमेची ची माहिती पहिली*
*आता आपण लौकिक गुरू व सद्गुरूंची माहिती पाहु*
*लौकिक गुरू पुष्कळ असतात कारण आपण ज्याच्या कडुन नवीन शिकतो ते आपले गुरू असतात जसे दत्तात्रयांनी 24 गुरू केले*
*सद्गुरू म्हणजे मोक्षदान शिष्यास करतात ते म्हणजे वैचारिक शुद्धता आणि ती आली की शेवटची स्थिती निर्विकार समाधी आणि त्यानंतर येते शिवतत्वाद्वारे जीव सेवा*
*आता आपण पाहू सद्गुरू कशा साठी पाहिजे तर लघु म्हणजे लहान होण्यासाठी म्हणजेच अहंकार व मी पणा सोडणे आणि एकदा का ज्ञान झाले की शिष्य कोणाच्या आधारावर राहणार तर गुरूच्या त्यासाठी गुरू पाहिजे*
*शिष्यला अज्ञानरुपी अंधकारातून काढून शिष्यला प्रकाश तत्वाकडे घेऊन जाणे*
*गुरू हे कोणी व्यवती मत्व नसून गुरुतत्व आहे सगळी कडे व्याप्त कारण आपण सगळ्यांन कडुन काही न काही शिकत असतो*
*आता आपण गुरुपूर्णिमेला व्यास पूर्णिमा का म्हणतात ते पाहु*
*महर्षी वेदव्यास हे विष्णूचा अंश अवतार त्यानी त्याच्या ज्ञानाने वेद राशीतून वेदांचा अंश घेऊन ते चार भागात विभागले व 18 पुरणाची रचना केली म्हणजेच जे वेद ज्ञान होते ते धरतीवर आणले*
*आत आपण व्यास या शब्दाचा अर्थ पाहू व्यास म्हणजे शून्य मंडळाला बरोबर मध्ये छेदते ती रेषा म्हणजे व्यास कसे ते पाहू निराकार ब्रह्माची अंतिम स्थिती म्हणजे शून्य मंडळ आणि त्यापलीकडे काही नाही निर्विकार निराकार अंतिम स्थिती*
*आपण समर्थ रामदास स्वामी कृत भीमरूपी सोस्त्र पाहिले तर त्यात त्यांनी लिहिले आहे "वाढीता वाढीता भेदीले शून्य मंडळा" तर आपण खरोखरच ते शून्य मंडळ भेदू शकतो का तर नाही फक्त त्यास जाणणे कसे तर ज्ञानाने "जसे महर्षो वेद व्यासांनी जाणले"*
*कसे तर जे शून्य मंडळ आहे त्यास जी बरोबर त्याच्या मध्य भागात छेदते त्यास व्यास असे म्हणतात म्हणजेच शिव शक्तीला जाणणे तर कोण जाणते तर ज्ञान आणि गुरू ते ज्ञान शिष्यास देतो आणि म्हणूनच गुरू पौर्णिमेला व्यास पौर्णिमा पण म्हणतात*
*व्यास म्हणजे गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्या ना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सद्गुरु चे सान्निध्य प्राप्त हो हीच सदिच्छा*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
*जय सच्चीदानंद स्वामी*
☸☸☸☸☸☸☸☸☸☸☸
*किशोर एस वैद्य बडोदा गुजरात*
🌺🌹🌸🍁💥🌷💦💐❄🌻🥀💐💦🌺🌹🌸💥🍁🌷
Comments
Post a Comment