.
*महाभारताचे "नऊ सार सूत्र".*
*१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल" -कौरव.*
* *२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील."-कर्ण.*
*३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल."- अश्वत्थामा.*
*४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." -भीष्म पितामह.*
*५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" -दुर्योधन.*
*६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते."-धृतराष्ट्र.*
*७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे." -अर्जुन.*
*८) "प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही."- शकुनी.*
*९) "नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही." -युधिष्ठिर.*
*जर या नऊ सूत्रांकडून धडा घ्या अन्यथा पुढे महाभारत होणे निश्चित आहे.*
*जो इतरांना संपविण्याची तयारी करतो, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.*
* दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा.अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे सुद्धा कळणार नाही*
*"माणसाचा दर्जा हा जात, धर्म व मिळकती वरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो . धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही."*
*आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा.* 💐💐😊
Comments
Post a Comment