शिव आणि पार्वती हे दैवतांचे युगुल मोठे अद्भुत आहे. ते आम्हा माणसांसारखेच एकमेकांवर अतिशय उत्कट प्रेम करतात, एकमेकांसवे सारीपाट खेळतात, तो प्राप्त व्हावा म्हणून ती एक पान फक्त खाऊन तप करते अपर्णा होते. रात्री आकाशमार्गे विहार करताना कुणा दीनदुबळ्या माणसांची दुःखे पाहून तिला दया यावी अन त्याने तात्काळ वर देऊन माणसांना दुःखमुक्त करावे. तो तिच्या यज्ञप्रवेशानंतर क्रोधाने बेभान तांडव करतो.
ती असताना तर तो तिच्यात प्रेमात इतका मग्न असतो की त्याची आरती करताना समर्थ रामदास
" ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा " अशी गुलाबी ओळ लिहितात.
कुणा अनाम शिल्पकाराने या दैवि युगुलाच नातं आपल्या कल्पनाशक्तीने पाषाणात कस उतरवलय ते या फोटोत पहा. अमृतमंथनात वासुकी नागाच्या मुखातून हलाहल विष बाहेर पडलय, ते कोण स्वीकार करणार ? विश्वाच्या कल्याणासाठी कर्पूरगौरम् करूणावतारम् असा भगवान शिवशंकर ते हलहल प्राशन करतो विषाच्या प्रभावाने कंठ काळानिळा होतो. शिल्पकाराने या मूर्तीत आजवर मी कुठेच न वाचलेली पुढची कथा पाषाणात कोरली आहे. महादेवाच्या बाजूला सखीपार्वती उभी आहे. तिने आपला हात त्या नीलकंठ महादेवाच्या गळ्यावर ठेवलाय. आपल्या दैवी सामर्थ्याचा वापर करून तिने ते हलाहल विष पुढे शरीरात भिनण्यापासून रोखले आहे. दोघांच्या ही चेहऱ्यावरचे भाव पहा....केवळ अद्भुत !
🌺🙏🌺🙏🌺🙏
टीप: आमचे एक संस्कृत चे गाढ अभ्यासक लिहतात,
" 👌👌👌👌
या लिखाणात एक चूक वाटते आहे, शिवाने तांडव नृत्य त्याची पहिली पत्नी सती (दक्षाची कन्या) हिने यज्ञात उडी घेऊन स्वतःला जाळून घेतले त्यानंतर केले, असे वाचल्याचे आठवते.*
Comments
Post a Comment