Skip to main content

वनस्पतींची निसर्गऊर्जा

वनस्पतींची निसर्गऊर्जा -                                                              रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून  ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..जंगलातल्या काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊर्जेचे अनेक अनुभव, अरण्य हेच आपलं घर मानून, सारं जीवन अरण्यात घालवणाऱ्यांना येतात. रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी ‘रानभूल’ म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव! त्याबद्दलचे थरारक अनुभव ऐकले, की मन थक्क होतं. रानभुलीला तशी अनेक नावं आहेत. गोंड आदिवासी याला ‘झोटिंग’ अथवा ‘सावडीत’ म्हणतात आणि त्याला भुताखेताचा प्रकार मानतात.  खेडय़ापाडय़ातले लोक ‘बाहेरची बाधा’ म्हणतात. पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही.काही झाडांच्या संपर्कात आल्यास, काही वेगळंच चतन्य जाणवू शकतं. मनाची बेचनी थांबते. उदा. उंबर आणि कोजाब (वटवृक्ष कुळातलं एक झाड). जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची  शक्ती आहे. ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते. मात्र ही शक्ती सर्वच वृक्षवेलींत नसते, ठरावीक परिसरात ती आढळते. डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी  सिद्ध केलं आहे, की झाडांना भावभावना असतात. समोरच्या व्यक्तीबद्दल नकारात्मक भावना येताच, म्हणजे त्या व्यक्तीची दुष्ट भावना उमजून झाडं, वृक्ष-वेली भीतीनं आकसतात. काही झाडं-फुलं सूर्यास्तानंतर मिटतात. तसंच सर्व वनस्पती संगीतामुळे बहरतात. आपण वातावरणातला प्राणवायू श्वासांद्वारे शरीरात ओढून घेतो आणि उच्छ्वासाद्वारे कार्बन-डाय-ऑक्साइड वातावरणात सोडतो. हा वायू वातावरण दूषित करतो. पण वृक्षवल्ली तोच ओढून घेऊन प्राणवायू पुरवतात हे सिद्ध झालं आहे. म्हणजे वातावरण शुद्धीकरण करण्याची वृक्षांना समज आहे. त्यांच्याजवळची ही उपजत अरण्यशक्ती विलक्षण आहे.

प्राचीन वेदांमध्ये वृक्षांबद्दलची ही जाणीव दिसून येते. ऋग्वेदात विविध वनस्पतींचं माहात्म्य वर्णन करून त्यांना हे देवत्व का दिलं आहे हे वर्णिलं आहे. यजुर्वेदात कोणत्या वनस्पतीचं कोणत्या यज्ञात कोणत्या वेळी हवन करणं स्वास्थ्यास उपयुक्त आहे, ते सांगितलं आहे. अथर्ववेदात विविध वनस्पतींचा उपयोग विविध आजारांमधे कसा करावा, हे सांगितलं आहे. साध्या खरचटण्यापासून ते बुद्धिभ्रंश, अपस्मार, क्षय आदी मोठय़ा आजारांवरही वनस्पतींचा कसा उपयोग करावा याबद्दल अनुभवसिद्ध माहिती दिली आहे. 

भृगु ऋषींच्या सांगण्याप्रमाणे अतिउष्णतेमुळे वा थंडीमुळे वृक्षांची पानं, फळं, फुलं म्लान होतात. याचा अर्थ त्यांना थंडी वा उष्णतेचं स्पर्शज्ञान असतं. वारा,आग किंवा वीज पडणं यांमुळे वृक्ष, त्यांची पानं, फळं विदीर्ण होतात. दूषित पाणी दिल्यास वृक्ष व्याधीग्रस्त होतात. तर निरनिराळं खाद्य, माती, पाणी दिल्यावर किडलेले, खुरटलेले,  रोगी वृक्ष बरे होऊन पुन्हा बहरून फळं-फुलं देतात. त्या अर्थी त्यांना गंधाचं व चवीचं ज्ञान आहे. पानांच्या श्वासोच्छ्वासादरम्यान काही प्रमाणात पाण्याची वाफही वातावरणात  सोडली जाते. त्यामुळे साहजिकच झाडांच्या सावलीतील तापमान २ ते ३ अंशांनी कमी असते.  अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. अर्थात त्या शक्तीचीजंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घूसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते. मग त्यांची स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया, हालचाल होते. काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणिमात्रांना गुंगी येते. प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो, आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! हाच चकवा, आणि हेच झोटिंग! तीव्रता कमी-जास्त असू शकते. या रानभुलीत सापडल्यानं कमकुवत मानसिकतेच्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. काही वेळा तर त्याचा इतका प्रचंड परिणाम होतो, की त्यावर कोणत्याही उपचारांचा लवकर परिणाम होत नाही.  ती व्यक्ती अर्धबेशुद्धावस्थेत राहते. आफ्रिकेत तर संपूर्ण माणूस गिळंकृत करणारं एक झाड आहे. काही वनस्पती दिवसा, तर काही सूर्य मावळल्यानंतर रातराणीसारखा उग्र गंध सोडतात. 

 स्वसंरक्षणासाठी वेली माणसाला तीव्र गंधाद्वारे गुंगवतात, भूल पाडतात. रानभूल ठरावीक अंतरापर्यंत आणि ठरावीक वेळेपर्यंत आपल्या मेंदूचा कब्जा घेते. चार-पाच व्यक्ती एकत्र असल्या तरी त्या एकमेकांना ओळखत नाहीत. या भुलीच्या सीमेबाहेर जाताच त्याचा परिणाम, गुंगी कमी होते. खंबीर व भक्कम मनाच्या व्यक्ती मात्र अशा रानभुलीतून बाहेर पडू शकतात. कमकुवत मनाच्या व्यक्तींवर मात्र त्याचा दीर्घ काळ परिणाम राहू शकतो. जंगलातले प्राणी, चरायला गेलेली गुरं, शेळ्या-मेंढय़ा, गुराखी, लाकूडफाटा गोळा करायला गेलेले बायका-पुरुष, खेडूत, आदिवासी यांनाही चकवा लागतो. ते भ्रमिष्ट होतात, फिरून फिरून त्याच जागी घुटमळतात. शेवटी थकून, कंटाळून भुताटकी समजून घाबरतात.अशा भ्रमिष्ट झालेल्या व्यक्तींवर प्रसंगी मांत्रिकाकडून अघोरी उपायही केले जातात. पण चकवा, रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही, ती एक नसíगक अरण्यशक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात.

 नवेगाव अरण्यातल्या अशाच एका अनुभवाची गोष्ट. नवेगाव अरण्यातला निसर्ग आणि वन्यजीवांचं निरीक्षण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली सतत जातात. एकदा एका शाळेतर्फे पाच दिवसांचं शिबीर तेथे भरवलं गेलं होतं. प्रत्यक्ष जंगलात वास्तव्य करून अरण्यवाचन शिकवलं जात होतं. वन्यजीव आणि त्यांची पर्यावरणातला समतोल राखण्यात होणारी मदत याबद्दलची माहिती दिली जात होती. काही वेळानंतर सर्वानी दुपारच्या जेवणासाठी परतीची वाट धरली. वाटेवरच्या पाणवठय़ावर मुलं तहान भागवण्यासाठी थांबली. तेव्हा त्यांची गणती केली गेली. पुढे शिक्षक विश्रांतीसाठी थांबल्यावरही सर्व मुलामुलींची गणती केली. सर्व मिळून २४ जण होते. तिथून त्यांचा कॅम्प ३ किलोमीटर अंतरावर होता. निघताना पुन्हा गणती केली. सर्व २४ जण उपस्थित होते. थकव्यामुळे सर्वाची चाल मंदावली. पुढे १ किलोमीटरनंतर  मागे-पुढे चालणाऱ्यांची गणती केली असता २ मुली आणि १ शिक्षिका दिसेनात. त्या थकव्यामुळे सावकाश मागे चालत असतील असं समजून मागे जाऊन त्यांना शोधलं, सर्वानी खूप हाकाही मारल्या. पण काहीच प्रतिसाद येईना. मागच्या पाणवठय़ावरही  शोधलं, पण त्या तिघी कुठेच दिसेनात. सूर्य डोक्यावर तळपू लागला. बाकी मुलामुलींना कॅम्पवर पोहोचवण्यात आलं, आणि त्या तिघींचा पुन्हा बारकाईनं शोध घ्यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र धास्ती वाटू लागली. तेवढय़ात अचानक एका नाल्यापुढे ओलसर मातीत मुलींच्या पायांचे ठसे दिसले. त्यांना साद घालत घालत, शोधपथक निघालं. नाल्यातून तसंच २ किलोमीटर चालत गेल्यावर मोहाच्या एका झाडाला टेकून ती शिक्षिका सुन्नपणे बसलेली दिसली. तिच्या कुशीत त्या २ छोटय़ा मुली थकूनभागून पहुडल्या होत्या. शोधपथक आनंदानं त्यांच्याजवळ गेलं. पण त्यांनी त्यांना ओळखलं नाही. तिघींना हलवलं तरी त्यांनी कसली हालचाल केली नाही. त्या भान हरवल्यासारख्या बसल्या होत्या. एकूण परिस्थितीवरून त्या रानभुलीच्या चक्रव्यूहात  सापडल्याचं लक्षात आलं. त्यांना आधार देऊन उठवलं, आणि १ किलोमीटर चालत आणलं. दरम्यान, शोधार्थ निघालेली वन विभागाची जीप तेथे आली. काही वेळानं त्या शुद्धीवर आल्या. पुढे ‘आकाशवाणी’वरच्या कार्यक्रमासाठी त्यांचे अनुभव ध्वनिमुद्रित केले गेले. तेव्हा ती शिक्षिका म्हणाली, ‘‘आम्ही सर्वाच्या मागे चालत होतो. तेवढय़ात एका मुलीला रस्त्याच्या डाव्या बाजूला सुंदर फुलं दिसली. ती तोडायचा मोह अनावर झाला, म्हणून तिघीही फुलांजवळ गेलो. तोच कसलातरी उग्र गंध आला आणि त्या वासानं आम्ही भांबावलो. काय चाललंय तेच कळेना. रस्ता दिसेनासा झाला. मुलींनी माझे हात घट्ट पकडले. आम्ही चालतच राहिलो. कुठे जातोय ते कळत नव्हतं. चालत चालत या नाल्यात आलो. थकव्यानं पायातलं त्राणच गेलं होतं, भान हरपलं होतं. फुलांचा मोह महागात पडला.’’याचा अर्थ स्वसंरक्षणासाठी त्या झाडानं उग्र गंध सोडून त्या तिघींना बेभान केलं होतं.

 रानभूल ही अशी जखडून ठेवते. अशाच अनेकांच्या अनुभवांतून लक्षात येतं, की जंगली वनस्पतींमध्ये एक गूढ शक्ती आहे हे नक्कीच. भूत, झोटिंग, बाहेरची बाधा, चकवा आणि रानभूल अशा वेगवेगळ्या नावांनी त्याची दहशत असते. पण ती निसर्गऊर्जा आहे, *अंधश्रद्धेचा विषय नव्हे.*
लेखक : अनामिक

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...