12/03/17, 4:34 AM - Shubhabgi Lele Kolhi:
पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत !
पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे.
डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा !
गूळ म्हणजे यमन!
यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व!
इथं तीव्र मध्यम श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा
(अन्यथा बट्ट्याबोळ!).
हां, आता ज्यांना जमत व गमतं
('प्रभू आजि गमला' या अर्थाने) नाही ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात म्हणजेच गुळात साखरही मिसळतात.
जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. 'गनिसा' ही संगती देस ची ओळख (सिग्नेचर) तसंच, रटरट आवाजाबरोबर घमघमाट येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण आणि देस हे ओघवते असावेत पण चंचल नकोत.
नंतर होरीप्रमाणे पुरणाचं वाटण करायचं. म्हणजेच लवकर आटपायचं .... ख्या ख्या
आता महत्वाचा 'टप्पा' ! पोळ्या करणे ! बिहागचा टप्पा साधायला कुण्या दिग्गज हाद्दूखान - हास्सूखान अशांचीच तालीम हवी. आणि सगळेच मालिनीताई होत नाहीत हे ही विनयशीलतेने मान्य करायला हवं. रागाला शरण जावं तशी निगर्वी शरणागती झाली तर हळूहळू जमेल. पण तपश्चर्या हवी.
आता अशा कमालीच्या रंगरस-संपन्न मैफलीत तराणा यावा तशी तुपाची धार!
तराणा मूळ आलाप-जोड यापासून वेगळा काढता येऊ नये अगदी तस्संच तुपानं पोळीशी अद्वैत करून असावं.
मग .. 'जो भजे हरिको सदा', 'चिन्मया सकल ह्रदया", "माई सावरे रंग राची" अशा विविध रूपांनी सर्वगुणसंपन्न भैरवीचं रसग्रहण करावं त्याप्रमाणे एकेक घास जिभेवर ठेऊन असीम आनंद घ्यावा. आणि मग "हेचि दान देगा देवा" अश्या थाटात 'अन्नदाता सुखी भव' म्हणावं.
भैरवीचे सूर मनात दीर्घ काळ रेंगाळावेत तशी पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळावी. दिवस सार्थकी लागावा ...... आयुष्य सार्थकी लागाव !!!
होळी पौर्णिमा आणि धुलीवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 💐
12/03/17, 6:39 AM - Ajit Kunte SHS: जागतिक पुरणपोळी दिन दोनतीन दिवसावर येऊन ठेपला.मुंबई आणि पुण्याच्या गृहिणी तयारीला लागतील म्हणजे नेहमीच्या दुकानदाराकडे जाऊन तयार पुरणपोळीची ऑर्डर देतील ,आमच्या खेडेगावातील माय भगिनी घरी तयारी सुरु करतील .एखादी चेक इन सेव्ही भगिनी आपला बरेच दिवसांनी चेक इन किचन वगैरे स्टेट्स अपडेट करेल ,गुगलवरील तयार फोटो पाठी पोळ्या करून दमलेल्या हावभावाच्या स्वतःच्या छबीचे फोटोशॉप उघडतील .पुरणपोळीवर कविता भाजल्या जातील .
ताई,माई अक्का ,विचार करा पक्का आणि बोबोबोबो .....
नैवेद्य म्हणून आपण हे पुरणपोळीच ताट व्यवस्थित सजवतो पण मला वाटत महाराष्ट्रात पुरणपोळी हि पदार्थातील अभिताभ बच्चन आहे ,ताटातील इतर पदार्थ हे फक्त नावाला असावेत बाकी सबकुछ अभिताभ म्हणजे पुरणपोळी .
ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु या उदराग्नीच्या शांतीमंत्रात आपल्याकडे पहिली आहुती वरणभाताची द्यायची परंपरा आहे .वदनी कवळ घेता हे फक्त वरणभाताची मुद मोडण्याच लायसन असल्याने ताटात वरणभात हवा.लग्नात आजी आजोबा प्रत्यक्ष लगीनघाईत फारसे महत्वाचे नसतात फक्त त्यांचे आशीर्वाद मिळावेत आणि काय आजी /आजोबा आता तब्येत कशी आहे हे विचारण्यासाठी काही जागा हव्यात म्हणून हि वयस्क मंडळी जशी लग्नात हवीत तेच स्थान पुरणपोळीच्या ताटात वरणभाताचे .वरणभात म्हणजे फक्त नवऱ्यामुलीचा मामा मुलीला बोहोल्या पर्यंत सोडणारा म्हणजे इथे पुरणपोळीला तोंडापर्यंत जाई पर्यंत साथ देणारा .
ताटातील उजवी बाजू म्हणजे भाजा हा तर या ताटात नाटकाच्या दोन प्रवेशात नेपथ्य बदलण्यासाठी केलेला ब्ल्याक आउट,तो आवश्यक असतो पण त्याची व्याप्ती फक्त काही सेकंदच .एक घास भाजीचा घेतला कि परत पुरणपोळीच मुख्यनाट्य सुरु .या पोळी बरोबर काही ठिकाणी काही नव्हे खूप ठिकाणी बटाट्याची भाजी करतात आणि एरवी मुख्य उमेदवार असलेल्या बटाटयाच या ताटात डीपोझीट जप्त होत ,मनापासून कोणीही खवैय्या या भाजीकडे ढुंकून देखील पहात नाही .खरतर त्या ताटाला देखील या भाजीच ओझाच होत पण करणार काय कधी कधी देवाबरोबर या दगडाची देखील पूजा करावी लागते .एकूणच पुरणपोळी आणि या भाजा हा प्राजापत्य विवाह प्रकार आहे म्हणजे पुरणपोळी या सुकुमारीचा अभिजात वर्गात मोडणाऱ्या बटाटा,फ्लोवर ,कोबीचा गड्डा या गधड्याशी लावून दिलेला विवाह .
कटाची आमटी हि अद्याप मी उत्तम चवीची कदाचित न खाल्याने मला पु .ल.न च्या भाषेत म्हणजे तो आमटीचे कट कारस्थान वाटते पण एकंदरीत महाजनो येन गतः सः सुपंथा या न्यायाने हि देखणी करवली पोळी बरोबर हवीच ,कधी कधी नवरीपेक्षा तीच जास्त मिरवते अस म्हणतात .
हो पण या ताटात ताटाची डावी बाजू भक्कम हवी .चटणी ,कोशिंबीर या साळकाया माळकाया हवेत पदर उडवीत ,नजरबाण मारून काही योद्ध्यांना घायाळ करण्यासाठी त्या या पुरणपोळी ताटात मिरवायला हव्यात .फक्त या दिवशी पापड वगैरे शक्यतो मांडवाबाहेर ठेवावेत .कायहोत कि ताटातील पुरणपोळीची जागा हे उपरे व्यापतात आणि मग पुरणपोळीला स्वतःची जागा आक्रसून घ्यावी लागते हे म्हणजे अंगणात किंवा परसदारी गाण वगैर म्हणत दिलखुलास वावरणारी नवीन सुनबाई पायवाटेवर सासऱ्याच्या वहाणेची करकर ऐकून जशी पूर्वी आत माजघरात पाळायची तशी पुरणपोळीची अवस्था होते .या दिवशी दही नावाच्या घट्ट गोसावड्याने तर या ताटाकडे फिरकू देखील नये .
इथे खाण्याचा एकच क्रम पहिली पुरणपोळी नंतर पुरणपोळी आणि शेवटी देखील पुरणपोळीच .
12/03/17, 2:42 PM - Girish Paliwal New:
कौन रंग फागुन रंगे, रंगता कौन वसंत?
प्रेम रंग फागुन रंगे, प्रीत कुसुंभ वसंत।
चूड़ी भरी कलाइयाँ, खनके बाजू-बंद,
फागुन लिखे कपोल पर, रस से भीगे छंद।
फीके सारे पड़ गए, पिचकारी के रंग,
अंग-अंग फागुन रचा, साँसें हुई मृदंग।
धूप हँसी बदली हँसी, हँसी पलाशी शाम,
पहन मूँगिया कंठियाँ, टेसू हँसा ललाम।
कभी इत्र रूमाल दे, कभी फूल दे हाथ,
फागुन बरज़ोरी करे, करे चिरौरी साथ।
नखरीली सरसों हँसी, सुन अलसी की बात,
बूढ़ा पीपल खाँसता, आधी-आधी रात।
बरसाने की गूज़री, नंद-गाँव के ग्वाल,
दोनों के मन बो गया, फागुन कई सवाल।
इधर कशमकश प्रेम की, उधर प्रीत मगरूर,
जो भीगे वह जानता, फागुन के दस्तूर।
पृथ्वी, मौसम, वनस्पति, भौरे, तितली, धूप,
सब पर जादू कर गई, ये फागुन की धूल।
फागुन का रंग सब पर चढ़ जाये
!शुभकामनायें!
🌈🌺🌾🍄🥀💐🐲🎄🏵
13/03/17, 12:50 AM - Sunil Bhat:
*प्यालों किती तरीही...*
प्यालों किती तरीही प्याले न मोजितो मी;
आहे पिता-पिवविता तो एक, मानतो मी.
अवकाश हाच प्याला अन् काळ हीच दारू;
थेंबात सांडलेल्या ग्रहगोल पाहतो मी.
कक्षेवरी उगा का कलते वसुंधरा ही ?
झुकली अशी कशाने तें एक जाणतो मी.
पापांत पुण्य मिसळी सत्यात अन् असत्य
जो कॉकटेलकर्ता, त्यालाच वानतो मी.
जो बाटलीत आहे, आहेच तो बुचात;
हें सत्य नास्तिकांच्या डोक्यांत हाणतों मी.
द्राक्षांत आजच्या या दारू असे उद्यांची,
आशा चिरंतनाची इतकीच ताणतो मी.
- *विंदा करंदीकर.* १९६५.
Messages circulated on WhatsApp.
Comments
Post a Comment