Skip to main content

चिऊ येणार

Messages on whataApp.

21/03/17, 1:34 AM - Maya Pande Londhe:

आज चिऊ येणार म्हणून घरात नुसती गडबड चालू होती...
..." अगं ए... नुसती परतून कुरतुरीत भेंडी कर हं... तुझी ताकाबिकातली नको..." ... आजी.
" कित्ती दिवसांनी चिवचिवाट येतोय घरी.... अगदीच सुनं पडलंय हल्ली हे घर..." आजोबा.
" संध्याकाळी पावभाजीच ना गं ?... तिचा लाडका 'फाल्लूदा' झोपताना मिळाला कि नुसती हुश्श््् करून पसरते... मस्त खुशीत झोपेल मग..." बाबा.
" येऊच दे गं तुझ्या लाडक्या लेकीला... मग माझं परत दोडकं भरीत करून कोप-यात ढकलाल मला..." हे भाऊरायाचं लटकं बोलणं.
आईची तर गंमतच... तिची खोली आवरून ठेव, घरात घालायचे कपडे तयार ठेव, आवडत्या पदार्थांची दिवसवार यादी नि तशी सामान भरायची लगबग...चार निवांत क्षण लेकीबरोबर मिळतील, बारीकसारीक शॉपिंगही आटपू तिच्याबरोबर..., ती मज्जा वेगळीच...अशा आनंदी विचारांनी गुणगुणत कामं करणारी चुटचुटी आई घराने ब-याच दिवसांनी पाहिली होती....
चिऊचं लग्न होऊन तसे साताठ महिनेच झालेले..एकदोनदा उभ्याउभ्या येणंजाणं भेटीगाठी... सगळं मस्त चाललेलं.. बाईसाहेब सासरी सुखात,लाडात... अगदी चैनीत होत्या. अत्यंत समजूतदार नि जीव लावणारे सासूसासरे, नि मनपसंत, सुखाची अगदी बरसात करणारा तिचा जोडीदार...!

.... आईबापांना दुसरं काय हवं असतं ?... पण तरी, लेक आठवडाभर रहायला येतेय म्हटल्यावर सरसरून टवटवीत झालं सगळं घर....!!
..... आल्याआल्या गळ्यात पडून भेटून झालं, स्वयंपाकघरातली भांडी उघडून ती चाचपणी झाली...कपडे नि कपाटं उगाच उचकटून झाली...बडबडबडबड करून सगळं घर जागवून झालं...बाबांना उगाचच ' आता मी सासरी ... आईआज्जीला स्वयंपाकात जरा मदत करा '... असा मिश्किल सल्ला... आजीआजोबांच्या खोड्या..भावाला 'चिऊचा भाऊ काऊ' वगैरे चिडवणं....हसणंखिदळणं... खळखळाट नुसता..!
एवढ्यातूनच ... मधेमधे... चिऊची बोटं चटचटपटपट फोनवर काहीतरी टाइप करतायत... कधी मंदस्मित नि कधी खुदकन् हसू... कधी लबाड चेहरा नि कधी कसनुसा...
काय त्या फोनचं मधेमधेच ?... आईला भारी उत्सुकता...
" हिचा चिमणा विचारत असेल... कश्शीय माझी राणी ??...." भाऊरायांचं चिडवणं...
" अरे तो आहेच रे..., पण आऊसाब पण विचारतायत, काय चाललंय म्हणून...." चिऊ.
" सासूबाईंना 'आऊसाब' हे नवीनच नाव हिचं... त्या गमतीत घेतात, तो त्यांचा भलेपणाच.. "....आजी.
" अगं... नाही गं आज्जी... खूप मस्त स्वभाव त्यांचा... 'आई ती आईच' असं म्हणतात..., उगाच 'अहो आई' वगैरे नको बाई म्हणूस...फॉर्मली... असं त्याच म्हणाल्या... मी कधीकधी त्यांना स्वीटहार्ट पण म्हणते गं...खूप मस्त स्वभाव आहे त्यांचा...." चिऊ अगदी रंगात येऊन सांगत होती... " डिशेस पण एक्केक मस्त बनवतात.. नको नको म्हणेस्तोवर... गरमगरम करून वाढत असतात... नवीननवीन काहीबाही रेसिपीज त्यांच्या... लय भारी ... मी वर्षभरात चांगली हेव्वीवेट चॅंपियन होणार...".... चिऊचं सासर-कौतुक तिच्या चेह-यावरून निथळत होतं नुसतं....
..... नंतरचे ५-६ दिवस पोरगी अगदी मस्त.... मज्जेत होती.. ऑफिसात चक्क सुट्टी टाकून मोकळी...!
सकाळी बाबांबरोबर मॉर्निंगवॉक... भावाला अंथरुणातून ओढून काढून मस्तीमजा... मग आईच्या नि आजीच्या स्वयंपाकात लुडबूड... आजोबांच्या बातम्यांमधेमधे मुद्दाम जाऊन खट्याळपणे गप्पा...
मधेच आईचे कपडे बुचकून जुने फेकायला लाव, बाबांच्या ड्रॉवरमधे वस्तू नीट लाऊन ठेव, भावाच्या मैत्रिणींचे फोटो त्याच्या मोबाइलवर शोधून त्याला चिडव...असे एकेक उद्योग चिऊचे...घर नुसतं हसतं-नांदतं झालं....
.... पण या सगळ्यात सासरची ओढ, सासूबाईंची आठवण, नौरोबांचे गुलूगुलू फोन.., मेसेजामेसेजी हे चालूच होतं... !
" इतकी छान सासरी रमली... चांगली माणसं मिळाली हं चिऊला आपल्या...विशेषत: सासूबाई भारीच लाडात ठेवतात तिला....".. बाबांच्या उत्साहित बोलण्यावर आईचा हलकाच हुंकार..."खरंय..."... एवढंच...!
" अगं... परवा ऐकलंस ?.... तुझ्या हातची आमटी जन्मात कुठेही मिळणार नाही म्हणणारी पोरगी... सासूबाईंच्या हातच्या वरणाची अगद्दी स्तुती करत होती...." आजी.
" हंंंंं".... आई.
" सासूबाई नेहमी कसलासा हेडमसाज करून देतात म्हणे... मस्त वाटलं ऐकून... खरंच, लाड आहेत ना ताईचे ??...." भाऊराया.
" हंंंंं"... आई..
आजूबाजूला हे सगळं कौतुक ऐकणारी चिऊ मधूनच येणारा आईचा हुंकार ऐकतेय... गालातल्या गालात मिश्किल हसतेय...
" चल गं अम्मूडे... आज मस्त शॉप्पिंग करूया.... मला मॅचिंग ओढण्या घ्यायचेत, नि बारीकसारीक काट्टाकुट्टी... "... चिऊच्या शब्दांनी आई एकदम टवटवीत ... !
.... काट्टाकुट्टी म्हणजे बाबांचा खिसा कापणारी चिटुकमिटूक खरेदी... कधी एखादी पर्स, कधी अशीच आवडली म्हणून सॅंडल, कधी एखादा उडता कुर्ता, कधी एखाद्या पर्मनंट प्रदर्शनातली आर्ट ज्वेलरी... काहीप्पण नि कुठ्ठेपण भरकटणारी शॉपिंग लिस्ट. हे असं मस्त भटकत काहीबाही विंडोशॉपिंग करणं म्हणजे मायलेकींसाठी वेगळंच बॉंडिंग..,... अगदी त्यांचंच दोघींचं नवरंगी, बिलोरी जग..!
दोघी तयार होऊन भटक भटक फिरल्या. थकून नेहमीचं आइस्क्रीम पार्लर गाठलं...चाखतमाखत आइस्क्रीमचा चट्टामट्टा करून झाला... घरी येऊन मस्त आईच्या कुशीत झोपलेली चिऊ बघून बाबांना अगदी भरून आलं...
" कशी लहानुश्शी झालीय गं तुझ्या कुशीत....खूप दिवसांनी अशी निवांत छोट्टीशी लेक मिळालीय ना तुला ?..." चिऊच्या केसावरनं हात फिरवत बाबा तिथेच बसले..
आईचे डोळे पाणावले... अलगद ते पुसून म्हणली...," तुमच्या लक्षात आलं का ?.... पोरगी मोठी झालीय..., आपल्यावाचून आसुसल्या माहेराला मोकळं हसवतेय, आपल्या सर्वांना थोपटत्येय,... मायेचा वर्षाव करतेय. आज तर ... फक्त माझ्याबरोबर वेळ घालवून माझा जीव शांतवलान. माहेरापासून दुरावायचं नाहीये ..., पण सासरचं प्रेमही ह्रदयी बाळगतेय...बरोब्बर तोल सांभाळतेय... एकीकडे सासूबाईंच्या मायेलाही प्रतिसाद देतेय... ! .....मोठी होतेय माझी चिऊ ..."
मिटल्या डोळ्यांत समाधान दरवळलं चिऊच्या...!
आईच जाणू शकते हे सगळं...असं दोन्ही घरांना जपून सांभाळणं तिच्याकडूनच तर शिकले मी...,
तरी वेड्या मायेने मधेच खंतावत होती....
....सहाआठ महिन्यात सासरी लळा लागलाच..., पण म्हणून तेवीसचोवीस वर्षांतली माझी या घराची माया कशी पातळ होईल..?... ही सगळीजण मला अवढ्यातच परकी कशी होतील....???... वेडाबाईच आहे ही आपली अम्मूडी...
.... विचार करताकरता चिऊचा आईभोवतीचा विळखा घट्ट झाला...जणू तीच आता आई झाली होती, नि तिच्या चिमुकल्या अम्मूला समजावत होती.......!!
#घरोघरी_अशा_चिमण्या_हव्यातच
#save_the_sparrows
❤❤❤❤❤❤❤
Chat history on "WhatsApp Chat"
















Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...