26/03/17, 11:28 AM - Sandesh Nayak: नाशिक - पंचवटी, गोदाघाट,भाजीबाजार, येथे *100"200"* फूट *मराठी_नववर्षानिमित्त* काढलेली भव्य *महारांगोळी*....
26/03/17, 11:29 AM - Sandesh Nayak: IMG-20170326-WA0021.jpg (file attached)
26/03/17, 1:52 PM - Sandeep Wachasunder SHS: ग्रेस स्मृतिदिन
मी खरेच दूर निघालो आहे
तू येऊ नको न मागे
पाउस कुठेतरी वाजे
हृदयाचे तुटती धागे
शेतावर ढग अडलेला
घे त्याला मागून पाणी
झाडावर कोकीळ येता
घे मागून एक विराणी
या फुलपाखारांनाही
ते उरेल मरणावाचून
सगळ्याच ऋतूंना मिळते
दु:खाचे उत्कट दान...
भरपूर सोडली आहे
पडवीत निजेला जागा
अन दूर तुझ्याहून दूर
प्राचीन फुलांच्या बागा...
थिजलेल्या वेळुनमधला
लागटेल तुलाही वारा
पाउस थांबल्यावरही
ताऱ्यांच्या पडतील गारा...
उध्वस्थ मंदिरे येतील
नजरेत तुझ्या दीप्तीने
खंडांतर करते पक्षी
दिसतील तुला तृप्तीने...
माझ्याहून गर्द मिठीचा
अंधार गळ्याला येईल
शिल्पास रूप देणाऱ्या
हातांचा विळखा होईल...
तळहातावरचा फोड
फुटणार अशा अनुरादे
वेदनेस नसते वीण
पडछाया तुडवीत जाणे
अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवढे गाणे...!
ग्रेस.
26/03/17, 1:52 PM - Sandeep Wachasunder SHS: भाषाच ही निकामी शब्दासही पुरेना
संवेदनाच द्यावी अर्थास काय पुन्हा ?
ग्रेस.
26/03/17, 1:52 PM - Sandeep Wachasunder SHS: यात काय करायचे असते आत्मसात ?
माझ्या धैर्याचा पुरावा ?
फकिरांचा उरुस ?
वसंताच्या पूर्वार्धातील पाऊस ?
हात सोडवून घेतानाची बातमी ?
स्तनावरचा तीळ ?
संन्याशाची आत्मपीडा ?
जिथे तुम्हाला सत्य सापडेल
तिथून मला निरोप धाडा...
ग्रेस.
चंद्रमाधवीचे प्रदेश.
26/03/17, 1:52 PM - Sandeep Wachasunder SHS: तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे
तीही अशा कातरवेळी,
उदाच्या नादलहरीसारख्या
संधीप्रकाशात...
आणि आई नसलेल्या पोरासारखे
हे माझे शहाणे डोळे
हलकेच जोडून देतो
नदीच्या प्रवाहात...
ग्रेस.
अप्रतीम ग्रेस
ReplyDelete