Skip to main content

कर्दळीवन परिक्रमा आणि भारतीय झाडे लावा

05/04/17, 6:42 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info.
07/04/17, 10:19 PM - Sandesh Nayak: ☘फक्त देशी झाडे लावा.☘

❗परदेशी झाडे पर्यावरणास घातक ❗।

👉आजकाल बहुपयोगी वड ,पिंपळ,चिंच ,फणस ,आवळा ,आंबा ,बेल,कडुनिंब ,मोह , कदंब ,पळस अशी भारतीय देशी झाडे लावायची सोडुन मॉडर्नपणाच्या खोट्या समजुतिने परदेशी कॅशिया,ग्लिरिसिडीया,फायकस ,सप्तपर्णी ,स्पॅथोडिया,रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे.पण ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले आहे.
👉परदेशी झाडांवर कधीही पक्षी🕊🕊 बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत .एकवेळ आपले पक्षी मुळ भारतीय असलेल्या रामकाटी बाभूळ या देशी झाडावर घरटे करतात पण परदेशी झाडावर करत नाहीत .( रामकाठी बाभूळ ही उंच वाढणारी पिवळी फुले येणारी मूळ देशी बाभूळ आहे ,मात्र आता सर्वत्र झुडुपासारखी वाढणारी वेडी बाभूळ ,बंगाली बाभूळ ,चिलार या नावाने ओळखली जाणारी बाभूळ परदेशी असुन १९७२ साली आयात केलेल्या गव्हा(मिलो )बरोबर भारतात आली आहे . )
👉परदेशी झाडाची पाने ,फुले ,शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,शेळी ,माकड कधीच खात नाहीत .माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्या समाजधुरीणांना कळत नाही हेच मोठे दुर्देव ❗❗
👉मुळ अमेरिकेतील ग्लिरिसिडीया या झाडाची पाने,फुले खाण्यात आली तर उंदीर देखील मरतात.त्याच्या आसपास गवत व इतर झाडे वाढु शकत नाहीत .या झाडाखालुन चालताना धाप लागते .या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो,त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते .इतके विषारी झाड आपल्याकडे सरकारी वृक्षारोपणातुन सर्रासपणे लावलेले आहे .जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत.१९७० च्या दशकात युरोपियन देशांनी षडयंत्र रचुन जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले.तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे .आपल्या शासकीय वनीकरण कार्यक्रमात वड ,पिंपळ ही देशी झाडे आजपर्यंत न लावल्यामुळे वनीकरण अपयशी ठरले आहे .
👉फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत .त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही .
👉शहरातील ज्या गार्डनमधे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .
👉इतक्या मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर ,काशीद ,सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे )
🍃वड,पिंपळ,पळस ही झाडे ज्या भागात आहेत तेथे हमखास पाउस पडतो.असे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .
🍃देशी झाडे मुबलक प्रमाणात ऑक्सीजन सोडतात व त्यांचे असंख्य आयुर्वेदीक उपयोग आहेत .
त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करुन पर्यावरणाला हातभार लावायचा असेल तर फक्त देशी झाडे लावा ही विनंती .🙏🍃🍃
☘हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करा त्यायोगे तुमचा वृक्षारोपणास हातभार लागेल
07/04/17, 10:24 PM - Sandesh Nayak: *कर्दळीवन परिक्रमा*
*एक साहसी अध्यात्मिक परिक्रमा*
*( Adventurous Spiritual Tourism)*

कर्दळीवन परिक्रमा ही एक अद्भुत आणि रोमांचक अनुभूती आहे. तिचे शब्दात वर्णन करता येणे अशक्य आहे. कर्दळीवन हे श्रीस्वामी समर्थांचे प्रकट स्थान आणि श्री दत्तात्रेयांचे गुप्तस्थान आहे. श्रीगुरुचरित्रामध्ये आणि श्रीस्वामी समर्थांच्या बखरीमध्ये त्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. कर्दळीवन सेवा संघाने आत्तापर्यंत कर्दळीवनाच्या ६५ हून अधिक यशस्वी परिक्रमा आयोजित केल्या असून ५१०० हून अधिक भाविक भक्तांना श्रीस्वामी समर्थांची आणि श्रीदत्तप्रभूंची कृपा अनुभूती मिळ्वण्यामध्ये खारीचा वाटा उचलला आहे.
असे म्हणतात की कर्दळीवनात जाण्याची फक्त आपली इच्छा असून चालत नाही तर आपण कर्दळीवनात यावे अशी अवधूतांची आणि श्री स्वामी समर्थांची इच्छा असावी लागते. दरवर्षी भारतात १० हजारांतून १ व्यक्ती काशी-रामेश्वरला जाते... २५ हजारांतून १ व्यक्ती बद्री-केदारनाथाला जाते...लाखांतून १ जण नर्मदा परिक्रमा करतो... १० लाखांतून १ व्यक्ती कैलास मानसरोवर यात्रेला जाते आणि ५० लाखांतून एखादी स्वर्गारोहिणीला जाते...
मात्र १ कोटीतून एखादीच भाग्यवान व्यक्ती कर्दळीवनात जाते...
कर्दळीवन परिक्रमेमध्ये एकूण ५ ठिकाणे आहेत.
१) वेंकटेश किनारा
२) अक्कमहादेवी गुहा
३) श्री स्वामी समर्थ यांचे प्रकटस्थान
४) मार्कंडेय ॠषी तपोभूमी
५) अक्कमहादेवी मंदिर.
या परिक्रमेमध्ये एकूण जावून येवून साधारणपणे ३५ किमी एवढे अंतर चालावे लागते. कर्दळीवन परिक्रमा कोणतीही धडधाकट व्यक्ती सहजतेने पूर्ण करू शकते. परिक्रमेसाठी कोणतेही मेडिकल सर्टिफिकेट लागत नाही. कर्दळीवन सेवा संघाबरोबर एका ८६ वर्षाच्या आजीबाईंनी संपूर्ण परिक्रमा पूर्ण केलेली असून एका ३ वर्षाच्या मुलीनेही चालत जावून ही परिक्रमा पूर्ण केली आहे. पालकांनी आपल्या बरोबरच्या लहान मुलांना बरोबर घेवून ही परिक्रमा करावी. बालवयात अध्यात्मिक आणि धार्मिक अनुभूतींचा अंतःर्मनामध्ये उमटलेला ठसा त्यांना आयुष्यात सतत नवनविन प्रेरणा आणि उर्जा देत राहतो.
मोजकी संख्या आणि नेटके नियोजन हे कर्दळीवन सेवा संघाच्या परिक्रमेचे वैशिष्ट्य आहे. संघाचे स्वयंसेवक सर्वांची काळजी घेतात. ग्रुपच्या सुरवातीला, मध्ये आणि मागे स्वयंसेवक असतात. आता परिक्रमेमध्ये हमालांचीही व्यवस्था संघाने केलेली आहे. ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ते जूनचा पहिला आठवडा अशा दरमहा दोन परिक्रमा असतात. त्यांचे वेळापत्रक आणि माहिती
www.kardaliwan.com/parikrama
या वेबसाईटवर दिलेली आहे. हे माहितीपत्रक आपल्या ई-मेल आयडीवर किंवा व्हॉट्स अप क्रमांकावरही मागवून घेता येते. *(व्हॉट्सअप क्र. 7057617018)* आता परिक्रमांची नोंदणी ऑनलाईन करायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे घरबसल्या ऑनलाईन नोंदणी करता येईल. तसेच मुंबई येथे सायन, ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच कोल्हापूर, सांगली, कराड, नाशिक, नागपूर, इ. ठिकाणी परिक्रमेची नोंदणी केंद्रे असून त्यांची नावे फोन क्रमांक वेबसाईटवर दिलेले आहेत.
परिक्रमा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुस्तकांचा संच भेट दिला जातो. परिक्रमा करण्यासाठी कर्दळीवनाची विस्तृत माहिती पुस्तकामधून मिळाल्याने परिक्रमेचा आनंद अनेक पटींनी वाढतो. कर्दळीवन परिक्रमेचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारे व्हिडीओ सुद्धा आपल्याला आपल्या स्मार्ट मोबाईलवर आणि संगणकावर पाहता येतील. तसेच युट्यूबवर www.youtube.com/kardaliwansevasangh
या लिंकवर पाहता येतील. पुणे आणि मुंबई येथून बरोबर येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना रू.५००/- ची विशेष सवलत असून दहा जणांच्या समूहा बरोबर अकराव्या व्यक्तीस परिक्रमेमध्ये निःशुल्क सहभागी करून घेतले जाते. १२ वर्षाखालील लहान मुलांना रू. 2000/- ची सवलत दिली जाते. कर्दळीवन परिक्रमेसाठी तेलंगणा राज्य सरकारच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची विशेष परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी त्यांच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. ती नसल्यास परिक्रमा करताना अनेक अडचणी येतात आणि परिक्रमा मध्येच सोडून यावे लागते. कर्दळीवन सेवा संघ त्यांच्या अटी पूर्ण करून आणि परवानगी घेऊनच परिक्रमा आयोजित करते. त्यामुळे परिक्रमा निर्विघ्नपणे पार पाडता येते.
केवळ साहस नाही आणि केवळ धार्मिकता नाही, तर साहस आणि अध्यात्म यांच्या मिश्रणातून एक अपूर्व आनंददायी अनुभूती देणारे दैवी जागृत स्थान म्हणजे कर्दळीवन. जे कर्दळीवनात एकदा गेले आहेत ते पून्हा पून्हा जातात. आजवर कधीही न अनुभवलेली एक अत्यंत उत्कट आणि शब्दात वर्णन करता येणार नाही अशी अनुभूती....
आपले अष्ट सात्विक भाव जागृत करणारी, जाणीवा समृध्द करणारी आणि भरभरून उर्जा देणारी कर्दळीवन परिक्रमा..... भिऊ नकोस....मी तूझ्या पाठीशी आहे असा नित्य निरंतर आधार देणारी.... स्वामी कृपेच्या वर्षावामध्ये न्हाऊ घालणारी आणि आपल्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी ... एक अद्भूत अशी परिक्रमा...
अनेकदा आपण अनेक गोष्टी वाचतो, ऐकतो, चर्चा करतो, विविध लोकांची विविध प्रकारची मते ऐकतो. पण शेवटी स्वानूभव हाच खरा असतो. " ऐकावे जनांचे... अगदी सगळ्यांचे... पण गाळून घ्याव, ते सत्याच्या चाळ्णीतून आणि निक सत्व तेवढ स्वीकारावे " असे म्हटले जाते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी कर्दळीवनाची अनुभूती घ्यावी आणि आपल्याला काही गवसतं का ते नक्की पहावे ही प्रार्थना !
कर्दळीवनाची अनुभूती अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहचावी असा कर्दळीवन सेवा संघाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्या अनमोल सहकार्याची गरज आहे. कृपया आमचे मेसेज आपल्या संपर्कातील सर्व क्रमांकाना, व्हॉट्स अप ग्रुपना, फेसबुक खात्यावर, यु-ट्यूबवर अधिकाधिक जणांना पाठवावेत. आपल्या खारीच्या वाट्याने स्वामीकार्यामध्ये हातभार लागेल आणि अनेक नविन भाविक भक्तांना कर्दळीवनाचे दर्शन घडविण्याच्या पुण्यकार्यामध्ये आपला सहभाग असेल.
*अधिक माहितीसाठी संपर्क करा.*
*कर्दळीवन सेवा संघ, पुणे –* ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, डेक़्कन जिमखना, पुणे – ४११००४
मोबाईल: 9371102439 / 020-25434601
व्हॉट्सअप क्र. 7057617018
संपूर्ण माहितीपत्रक आणि ऑनलाईन नोंदणी साठी खालील लिंक वर जा.
http://www.kardaliwan.com/parikrama
फेसबुक पेजमध्ये सामील व्हा :
http://www.facebook.com/KardaliwanSevasangh
यूट्यूब चॅनेलला भेट द्या:
www.youtube.com/kardaliwansevasangh

Chat history is attached as "WhatsApp Chat txt"

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...