*चल मेरी लूना*
ज्याकाळी पुणे ते मुंबई अंतर पार करायला बाकीच्या रेल्वे गाड्यांना ५ तास लागत हेच अंतर डेक्कन क्वीन पावणे तीन तासात पार करत असे.
१ जून १९३० साली सुरु झालेल्या डेक्कनक्वीन कधीच वाफेच्या इंजिनवर चालली नाही. पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिक इंजिनावर चालणारी पहिली प्रवासी गाडी, भारतातील पहिली डिलक्स गाडी, पहिली सुपरफास्ट गाडी, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी पहिली गाडी, महिलांचा व खानपान सेवेचा स्वतंत्र डबा असणारीही ही पहिलीच गाडी.
डेक्कन क्वीनच्या नावावर असे पहिले पणाचे अनेक विक्रम नोंद आहेत. भारतातील मानाची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन क्वीनच्या नावे आणखी एक विचित्र विक्रम आहे.
“लुना कडून हरण्याचा विक्रम”
लुना कोणाला माहित नाही? पुणेकर फिरोदियांच्या कायनेटिक ग्रुप कंपनीने जपानच्या होंडाच्या सहकार्याने लुनाची निर्मिती केली होती. इटालीयन प्याजिओच्या चिआओ नावाच्या गाडीची ही लायसन्स कॉपी होती.
१९७२ साली ही गाडी लॉंच झाली आणि आल्या आल्या भारतभरात या गाडीची हवा सुरू झाली.
वजनाला अगदी हलकी, छोटी सुटसुटीत बाईक सायकलला एक उत्तम पर्याय होती. पुण्यासारख्या सायकलींच्या शहरात तयार होणाऱ्या लुनाने झटक्यात मार्केट मारले. कित्येकांनी ही गाडी बुक केली.
सुरवातीला अनेकांना शंका होती की,
भारतात अनेक ठिकाणी रस्ते कच्चे आहेत तर ही गाडी तिथे कशी टिकेल? लुनाला स्पीड असणार की नाही?
यासाठी फिरोदियानी लुनाची पब्लिसिटी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या.
टीव्ही वर्तमानपत्रात याच्या जाहिराती झळकू लागल्या. तरुणांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेटच्या सामन्यावेळी मॅन ऑफ द मॅच म्हणून ही लुना बक्षीस दिली जाऊ लागली.
फोर्स मोटर्सचे चेअरमन अरुण फिरोदिया यांना आठवते त्या प्रमाणे फेमस क्रिकेटर संदीप पाटील, चंद्रशेखर यांनी ही लुना जिंकली होती. दहावी बारावीच्या बोर्डात नंबर काढणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लुना बक्षीस दिली जायची.
यापेक्षाही वरताण म्हणजे लुनाच्या वेगाची खात्री सगळ्यांना पटावी म्हणून थेट डेक्कन क्वीन एक्प्रेसबरोबर तिची रेस लावणार असल्याच जाहीर केलं.
अनेकांना गंमत वाटली. ५० सीसी ची ही छोटीशी मोपेड भारतातल्या सुपरफास्ट ट्रेनशी कशी काय स्पर्धा करू शकते? हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे असा अनेकांना गैरसमज झाला. पण अरुण फिरोदिया सिरीयस होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते पुणे स्टेशनवरून शर्यतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला व दादरला शर्यत संपणार तिथे मुंबईचे पोलीस कमिशनर यांना स्पर्धेचा विजेता घोषित करण्यासाठी परीक्षण करण्याची विनंती केली.
सकाळी ठीक ७.२० वाजता नेहमीच्या टायमिंगला डेक्कन क्वीन पुणे स्टेशन वरून सुटली.
त्याचवेळी जयंतराव टिळक यांनी हजारोंचा जमाव व पत्रकारांच्या साक्षीने लुनाला देखील हिरवा झेंडा दाखवला.
लुनास्वाराने जीव तोडून गाडी हाकली. तेव्हा मुंबई पुणे जुना महामार्ग होता. आज आपण पाहतो तो एक्स्प्रेसवे अजून अस्तित्वात यायचा होता. खंडाळ्याचा प्रचंड मोठा घाट तिथला वळणावळणाचा रस्ता अशी अनेक आव्हाने लुना समोर होती. अनेकांनी पैज लावली होती की लुना लोणावळ्याच्या देखील पुढे जाऊ शकणार नाही.
पण या साऱ्यांचा अपेक्षाभंग करून लुनाने आपल्या स्टाईलमध्ये घाटरस्ता पार केला.
अरुण फिरोदिया सांगतात की वाटेत इमर्जन्सी साठी मदत म्हणून आम्ही एक कार देखील लुनाच्या पाठोपाठ पाठवली होती. मात्र लुना एवढ्या सुसाट सुटली होती की कारला देखील तिला गाठणे अशक्य होत होतं.
लुनाने जेव्हा मुंबईत प्रवेश केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण फिरोदिया यांना लुना ही शर्यत पूर्ण करेल याची खात्री होती पण ती तब्बल १५ मिनिट लवकर दादर मध्ये दाखल होऊन सर्व शक्तिमान डेक्कन क्वीनला हरवेल हे खुद्द त्यांनी स्वप्नात देखील पाहिलं नव्हत.
पण हे खरोखर घडल. टाळ्यांच्या गजरात लुना डेक्कन कवींच्या आधी दादर स्टेशनला पोहचली.
तिला गाठायला डेक्कन क्वीनला १५ ते २० मिनिटd लागले. ५० सीसी ची मोपेड लुना जिंकली होती. मुंबईत वार्ताहर हा सोहळा बघण्यासाठी हजर होते. दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लुनाचीच चर्चा होती.
त्यानंतर ‘चल मेरी लुना’ च्या आडव येण्याची हिंमत कोणाची उरली नाही 👌👌👌
Some memories of friends and mine too after reading this article.
[8/8, 05:24] Manoj Shambharkar SHS: I love Luna. 👍👍
[8/8, 08:25] Suhas Dhamorikar: 👌👌
[8/8, 09:49] Girish Awandhe SHS: 👌👌
[8/8, 09:52] Nitin Ambaikar SHS: Luna was a queen when we were studying 😂.
I remember, Amrut and me going to college on Luna, purple colour. Atul P had blue colour. I had bicycle. When Amrut would go and drop mother to office, I used to go to college by cycle.
We had registration NOS. Known and used to identify friends (मित्र आणि मैत्रिणी) present from parked Lunas.
I bought first Luna after I joined Thermax. It was there with us for 3-4 years in Pune. We, self and Manisha have enjoyed Chinchwad - Pune, to&fro ride no of times. All golden memories 😍 of every family attached with Luna.
Again, Luna could not keep up pace of changing face of Auto industry and got outdated.... It happens......
[8/8, 10:19] Madan Kalwit: 😊😊👌👌
[8/8, 10:22] Milind Bandhavkar SHS: 👍👍👍
[8/8, 11:10] Harshada Kolwadkar Marathe SHS: माझी पण होती ग्रीन लुना 😂👌🏻👌🏻
[8/8, 11:23] Makrand Bhagwat SHS: MXF 1601
[8/8, 11:45] Adv Vandana: खरय.. चल मेरी लूना..माझ्या कडे सायकलीनंतर लुना होती , माझी लुना मरुन रंगाची होती..मी मुंबईत subburbs मधे चालविली (घर ते लोकल स्टेशन आणि जवळपास), लग्ना नंतर मी सासरी घेऊन आले..१९९५ मधे आमची अहमदाबदला बदली झाली. मी लुना तिथं ही नेली..विलास कडे motorcycle आणि माझ्याकडे लुना..२ लहान मुले.. नीहार ३ आणि अबोली ११ महिने..
खरोखर लुना ने खूप साथ दिली तिथल्या २.५ वर्षाच्या वास्तव्यात..सोसायटी मधल्या मैत्रिणी खूप हेवा करायच्या..माझ्याकडे लुना असल्यामुळे मी सर्व बाहेरची कामे बेमालूम करायची.. नो टेन्शन..भाज्या, फळे, किराणा, बिल भरणे, बऱ्या पैकी लांब जात असे 😀... नीहर समोर उभा राही मग त्याला कॉम्प्लेक्स मधे चक्कर मारणे , शाळेत पोहवणे मे करत, डॉ कडे नेणे. पण अबोली ला काही सुरवातीला शक्य नव्हते, थोडी मोठी झाल्यावर तिला play school मधे टाकले त्यावेळी तिला पण लुना वर उभे राहायला शिकवले...ह्या लुना ने मला खूप सुख दिले, २ लहान मुले असून ही खूप independent केले.... पण मुंबई ला परत बदली झाली आणि माझी लुना विकली..😏
[8/8, 11:45] Ajit Kunte SHS: MVJ 6564 my Luna number whi I sold at Jalgaon
[8/8, 11:48] Ajit Kunte SHS: My 1st posting
[8/8, 11:48] Swati Gokhale: मी पण लूना खूप चालवली आहे . युनिव्हर्सिटी कॅम्पस ला जाताना LIT chya पुढे चढावा वर लुना जाईल का नाही अशी भीती वाटायची 😀 पण येताना उतारावर खूप मजा यायची.😀माझी ग्रीन कलर ची होती.
[8/8, 11:49] Adv Vandana: 👍
[8/8, 11:51] Swati Gokhale: वंदना लक्षमिनगरला तुझ्या मामींकडे मी लुना नेच यायचे 😀
[8/8, 11:53] Adv Vandana: हो आठवते.
मला माझ्या लुना चा नंबर आठवत नाही, पण त्यावेळी मुबई पेट्रोल ₹.७/- या भावाने मिले होता होत ₹.७.५ /- झाले..त्यावेळी तेही खूप महाग वाटे 😀
[8/8, 11:53] Swati Gokhale: 😀😀
[8/8, 11:59] Makrand Bhagwat SHS: My Baba had a Vespa MHN 8636
We lived in Dhantoli then
Behind Uhoji petrol pump
I remember Baba filling at Rs. 1.20
[8/8, 12:00] Makrand Bhagwat SHS: Must be 1975
[8/8, 12:00] Adv Vandana: OMG😱
[8/8, 12:01] Makrand Bhagwat SHS: Udhoji pump
[8/8, 12:03] Maya Pande Londhe SHS: Mazi maroon colour chi hoti . 1st year BSc la ghetali hoti. (1983)College madhye phakt mazyakadech hoti. Phar bhav khalla. 😜.
[8/8, 12:04] Adv Vandana: 😃👍
Comments
Post a Comment