Skip to main content

साबुदाणा खिचडी

*साबुदाणा  खिचडी*   
                             
*पोर्तुगीज भारतात आले म्हणून आपल्या उपवासाची सोय झाली*

 आपल्या पैकी अनेकांनी उपवास केला असेलच. 

बऱ्याचजणांनी श्रद्धेपोटी केलाय 
तर 
काहीजणांनी फक्त साबुदाण्याची खिचडी खायला मिळावी 
म्हणूनच उपवास केलाय. 

आज सगळ्यांच्या डब्ब्यात खिचडी हमखास आढळते.


साबुदाण्याची खिचडी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय उपवासाचा पदार्थ.


 पण याचा आणि उपवासाचा काय संबंध हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय काय?


साबूदाणा खिचडीचा  इतिहास आपण जाणूनच घेतला नाही.


भगवान भोलेनाथ शंकराचा वाढदिवस होता. माता पार्वतीने सगळी तयारी केली पण गणपतीने ते सगळ जेवण संपवलं. भगवान शंकराना उपवास घडला. पार्वती देवीनी आयडिया केली. झटपट साबुदाने भिजत घातले आणि त्याची मस्त खिचडी बनवली. भोलेनाथाला ती खिचडी आवडली तेव्हा पासून त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे माझ्या प्रत्येक वाढदिवसाला जो कोणी भक्त उपवास करेल आणि साबुदाणा खिचडी खाईल त्याच्यावर मी प्रसन्न होईन.

सॉरी बॉस. 

अशी कुठलीही स्टोरी पुराणात नाही. स्टोरी जाऊ द्या आपल्या पुराणात साबुदाणाच नाही.

आता तुम्ही म्हणाल पुराणातली वांगी पुराणात. तर ही वांगी सुद्धा पुराणात नाहीत. 
असो.

 तर रामायण महाभारत सोडा अगदी परवा परवाच्या पेशवाईमध्ये सुद्धा बाजीराव पेशव्यांनी मोहिमेला जाण्यापूर्वी साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती असा उल्लेख नाही.


मग ही साबुदाण्याची खिचडी आली कुठून??


तर दिल थांम के बैठीये, भारतीय उपवासाची सोय लावणारा साबुदाणा आणला पोर्तुगीजांनी.


 विश्वास ठेवू वाटत नसला तरी हे खरं आहे.

साबूदाणा बनतो ते टॅपिओका झाड मुळचे दक्षिण अमेरिकेचे. याच्याच कंदापासून साबुदाणे बनवले जातात.


 साबुदाण्याचा पहिला उल्लेख १२२५ मध्ये , झाओ रुकोव यांच्या “झू फॅन झीही “, या पुस्तकात आढळतो. या पुस्तकात त्यांने विविध देश आणि त्यांचे विशिष्ट अन्नपदार्थ यांचे वर्णन केले आहे. यात तो ब्रुनेई मध्ये १२व्या शतकात साबुदाणा वापरला गेल्याची नोंद करताना दिसतो.

व्यापाराच्या निमित्ताने युरोपियन देशांनी जगभर वसाहती उभ्या केल्या आणि 
इकडची खाद्यसंस्कृती तिकडे 
अशी सर मिसळ करून टाकली.

यातूनच सतराव्या शतकात हे साबुदाणे भारतात आले. 
केरळच्या मलबार भागातील उष्ण दमट हवामान सूट झाल्यामुळे टॅपिओकाची लागवड तिथे होऊ लागली.


आता हे साबुदाणे उपवासाच्या पदार्थात कसे घुसले हा संशोधनाचा विषय आहे. काही जाणकारांच्या मते ही गुजराती दुकानदारांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. 

आपल्याकडे उपवासात कंद खावे असे सांगितलेले आहे 
आणि 
साबुदाणा कंदापासून बनतो 
मग तो उपवासाला चालतो असा विषय झाला. 
त्याची चव देखील भारी होती. 

मग काय हळूहळू लोक आवडीने हा साबुदाणे खाऊ लागले. 

पण गंमत म्हणजे साबुदाण्याची खिचडी बनवायला लागणारे साबुदाणे, शेंगदाणे, बटाटे, मिरच्या हे सगळं पोर्तुगीजांनी भारतात आणलंय.

भारतात साबुदाण्याचे कारखाने सुरु होण्यासाठी १९४३-४४ साल उजाडावे लागले.

तामिळनाडूच्या सेलम मध्ये भारतात साबुदाण्याची निर्मिती सुरु झाली.

 याचा परिणाम असा झाला की भारतातकाश्मिर ते कन्याकुमारी सगळीकडच्या दुकानात साबुदाणे मिळू लागले. 

गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक इथे  घराघरात साबुदाण्याची खिचडी बनू लागली.

आणि 

आता तर आषाढी एकादशी असो की श्रावण सोमवार प्रत्येक उपवासाला आपण खिचडीशिवाय राहू शकत नाही. 

*हे सगळ पुण्य जातं पोर्तुगीजांना.*

😉😄

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...