Skip to main content

Posts

जातिवंत कवी

जातिवंत कवी... किती चपखल वर्णन केलयं बघा,  एकदा प्रविण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरलेयत... दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे... मग असे दोन वेगळे शब्द का ...  शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा... त्या म्हणाल्या... चुकतोयस तू प्रविण... जे निरभ्र असते ते *आकाश*.. आणि.. जे भरून येते ते *आभाळ*.... 😊😊 Source: Whatsapp..

अनामिक कविता

एखाद्या रात्री कधीतरी  जमा होतात सावल्या, गरम होतात डोळे नि  तडतडतात बाहुल्या... मुक्यानेच सांगू लागतं  दुखलेलं पाणी,  "इतकं हळवं चुकूनसुद्धा  असू नये कोणी..." गाऊ नये कोणी कधी  उदास उदास गाणी, कळावीत सारी दुःखं  इतकं होऊ नये ज्ञानी... वाचूच नये मुळात कुठलं  जाडजूड पुस्तक, विचारांपासून शक्यतो  दूर ठेवावं मस्तक... जशी नजरेस दिसतात  तशीच पहावीत चित्रं, जसे आपल्याशी वागतात  तसेच समजावेत मित्र... उगाच फार खोल आत  नेऊ नये दृष्टी, खऱ्या समजाव्यात  साऱ्या सुखांताच्या गोष्टी... पेनाच्या जिभेवरच  सुकू द्यावी शाई,  फार त्रास होईल  असं लिहू नये काही... हळवं बिळवं करणारे  मुळात जपूच नयेत छंद, करून घ्यावीत काळोखाची  सगळी दारं बंद... सायंकाळी एकटं एकटं  फिरू नये दूर, समुद्रकिनारी लावू नये  आर्त, उत्कट सूर... चालू नये सहसा फार  ओळखीची वाट, भेटलंच अगदी कुणी  तर मिळवावेत हात... जमल्यास चारचौघात  बघावं थोडं मिसळून, लहान मुलासारखं कधीतरी  भांडावं उसळून... आवडणार नाही  पंचमीच्या चंद्राची कोर, एवढंसुद्धा कोणी कधी  होऊ नये थोर... घट्ट घट्ट बसलेल्याही  सुटतातच गाठी, कपाळावर म्हणून सारखी  आणू नये आठ...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

आतातरी बाई जगायला शीक..

Courtsey Adv. Nilima Kanetkar, mother of Urmila Kothare Dedicated to all wonderful woman that you are 😊🤓 प्रत्येक स्त्रीने शिकावं असं काही.....आता खूप झालं, बास झालं थकले आता म्हणायला शीक केलं तेव्हढं पुरे झालं आता थोडं थांबायला शीक नाती गोती कुटुंब कबिला बाजूला जरा ठेवायला शीक इतरांसाठी आयुष्य वेचलं स्वतःसाठी जगायला शीक विसरून रोजची कामं खुशाल उशिरापर्यंत लोळायला शीक संसाराचं ओझं आपलं  थोडं share करायला शीक कसं होईल, काय होईल चिंता सर्व टाकायला शीक माझ्याविना घर हे चालेल असा विश्वास ठेवायला शीक जॉब, घर, मुलं आणि बिलं यांची कसरत विसरायला शीक Superwoman व्हायचं सोडून दमानं जरा जगायला शीक घड्याळाची endless टिकटिक दुर्लक्षित तू करायला शीक उठल्यापासून झोपेपर्यंतच्या कामाचे हिशोब विसरायला शीक आपल्या उरावर घेतलेली कामं आतातरी टाकायला शीक गेलं उडत काम म्हणून निवांत पुस्तक वाचायला शीक पाय पसरून, पेपर धरून चहाचे घोट घ्यायला शीक Calorie count विसरून जरा आयतं food मागवायला शीक याचं जेवण त्याचा डबा कपडे याचे नि औषध काढा घर पसारा भाजी पाला सगळं सगळं सोडायला शीक कोणासाठी न थांबता Steering हाती धरा...

अपेक्षा

*"अपेक्षा "* आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, "बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे?  तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी." मुलगा म्हणाला, "आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन." आई स्मितहास्य करित म्हणाली, " अरे वेडया हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन् हो, तू जेव्हा खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा  ऐहिक सुखाची गरजच नसेल मला." मुलगा म्हणाला,"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर" आई आता हसली म्हणाली, "सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच ईच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न कराव ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेक...

लोणार एक रहस्य

लोणार एक रहस्य...  बुलढाणा जिल्ह्यातील लोणार विवर हे जागतिक आश्चर्य आहे. लोणार विवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणार ला भेट द्यावीच. प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला अशनी अस म्हणतात. जवळपास ५२,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला. ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे ६ मेगा टन शक्तीचा स्फोट झाला. आपल्याला ज्ञात असलेल्या हिरोशिमा-नागासाकी इथली शक्ती ०.२५ मेगा टन इतकीच होती. म्हणजे लोणार इथली धडक पूर्ण भूतलावर त्यावेळी जाणवली असेल असा शास्त्रज्ञाचा होरा आहे. इतक्या प्रचंड टक्करीमुळे पृथ्वी सुद्धा आपल्या व्यासात हलली असेल. अस सुद्धा काही शास्त्रज्ञ सांगतात.  इतक्या प्रचंड ऊर्जेमुळे १.८ किलोमीटर व्यासाच तसेच १३७ मीटर खोलीच एक विवर तयार झाल. ह्या टक्करी मधून झालेल्या उर्जेमुळे इथल ताप...

*नांदत्या घराची किंमत ....*

*नांदत्या घराची किंमत ....* ....दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून  मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात.  त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते. 7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता . " मी आलेय फोटो घेऊन . डेक्कन च्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का ?"  अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी . मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला . झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या . फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा , हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात .  ब्रेकफास्ट ची वेळ होती . नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती .मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून .  शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या , " मी ...