Skip to main content

Posts

अन्नपूर्णा

 *अन्नपूर्णा* माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान.  एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढय़ात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच रहाते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते. घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खातपीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो. गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. च...

अंगारकी चतुर्थी चे महात्म्य

12/06/17, 7:17 AM - Messages to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 13/06/17, 7:40 AM - Sriraspradnya SHS: *अंगारकी चतुर्थी* *=============* *( उद्याची संकष्टी चतुर्थी "अंगारकी " म्हणून का संबोधिले जाते ह्या बाबतची उपयुक्त माहिती जाणून घ्या.)* आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व *गणेश भक्त* संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ति *श्रीगणेशा* ची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि *चंद्रोदया* नंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी जेंव्हा *मंगळवारी* येते तेंव्हा हिला *अंगारकी चतुर्थी* म्हणून संबोधिले जाते. ह्या मागची कथाही तितकीच रंजक आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी *भरद्वाज* हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून *अंकारक* नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीन...

सुर तेची छेडीता

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼          *सुर तेची छेडीता* भारतीय संगीतातील सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत एका संस्कृत श्रुती साहित्यात उल्लेख आहे असं 'केसराचा पाऊस' ह्या मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात वाचलं ..... मोर षड्ज सुरात तर चातक ऋषभात ... बकरा गांघार तर कोकीळ पंचम बोलतो. बेडूक व क्रौंच मध्यम, धैवत तर हत्ती नाकातून निषाद स्वराचं उच्चारण करतो .... असा त्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे ... सृष्टीतील पशु पक्ष्यांकडूनच माणसाला सूर अवगत झाला असावा …. आम्रमंजिरी पाहून कुहूकुहू करणारा कोकिळ , ढगांना पाहून आनंदून जाणारा पपीहरा ह्यांच्यापासून तो आपल्या भावना सुरांत व्यक्त करायला शिकला असावा … " कोकिळ कुहूकुहू बोले, तू माझा तुझी मी झाले " " अम्बुवा कि डाली पे बोले रे कोयलिया " " बोले रे पपीहरा, पपीहरा " " बदल घिर घिर आये , पापी पपीहरा गये " " सा रे ग म प ध नी सा " सुरांची दुनिया. सातंच सूर .... तरीही केवढं प्रचंड सामर्थ्य आहे या सप्तसुरांमध्ये. प्रत्येक सुराचा बाज वेगळा, पोत वेगळा. पण जे काही आहे ते सारं फक्त जणु ह्या सात सुरांमध्येच एकवटलंय....

*Hungama Hai Kyon Barpa*

*Hungama Hai Kyon Barpa* "Hungama Hai Kyon Barpa" is a popular ghazal, especially in the renditions, sung by Ghulam Ali.It is written by the Akbar Allahabadi. It is composed in Raag Darbari Kanada. This ghazal was for the first time used in a Pakistani film Aap Ka Khadim which was directed by Wazir Ali, Music was composed by Khalil Ahmed and sung by Mehdi Hassan but the lyrics were credited to Tasleem Fazli as he penned the lyrics of that film.Later Ghulam Ali adopted it with same basic music composition and made it popular. *Context of this GAZAL..* Akbar Allahabadi's song is clearly about the pleasures of imbibing alcohol, it is claimed that its genesis is in the social context of the British Raj in India, at a time when the Muslim League had begun to exert its independent approach to interacting with the British, against the wishes of the Congress. Some Muslims, including Akbar Allahabadi, hoped for Hindu-Muslim unity. This caused others to suggest that he had been giv...

*रामरक्षेची उत्पत्ती*

रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ? "तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीत...

जगण्याचा तोल हा असा असतो !

पाऊस पडून गेला की आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमलतं ; त्याला पाहून मातीनं रुसावं का ? सगळे रंग आकाशात तसेच ठेवून आलास, मला काय दिलंस   म्हणून भांडावं का ? *** नाहीच भांडत ती , मान्य करून टाकते की , त्याचं रंगहीन होऊन आपल्याकडे येणं , उगीच मनाला लावून घ्यायचं नाही , त्या कोरडय़ा सुंदर रंगापेक्षा आपल्याला काय मिळालं हे पहायचं    ! *** तो भरभरून बरसतो, तेव्हा रंगहीन असतो हे खरं ; पण तो तिला जगण्याची,उमलण्याची ,  स्वत:तून रंग फुलवण्याची जादू देतो. त्या जादूनं , काळ्या मातीतून किती रंग उमलतात , आणि रंगच कशाला , किती गंध , किती आकार, किती प्रकारचं जगणंही बहरतं ! क्षणभर उजळणा:या रंगापेक्षा स्वत: अनेक रंगांत उमलण्याची जादू  म्हणून तर काळ्या मातीला किती युगं झाली, तरी हवीच असते त्याच्याकडून . *** जगण्याचा तोल हा असा असतो ! कुणाला क्षणभराचे रंग मिळतात , कुणाला सुंदर क्षण मिळतात , कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहतं , तर कुणाला मिळतं फक्त जगण्याचं बीज . त्यातून आपापलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते . एकदा ती जादू आली की , रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत, ते उमलत राहतात, बहरत राहतात. *** ( एका स्पॅन...

#चिवड्याचे_थालीपीठ#

  या पदार्थासाठी घरी जवळपास 10/15 दिवस जुना आणि कुणी खात नसल्याने दीनवाणे कटाक्ष फेकत असलेला चिवडा हवा. आधी या चिवडा संपावा म्हणून घरातल्यांना आग्रह करून त्यांची बोलणी खाल्लेली असावी म्हणजे आई तुला खपवाखपवी करायला आम्हीच लागतो का असे मुलांनी म्हणायला हवे. ए तुझे चिवडा पूराण बस कर बाई तु खा मला नको असे नवर्याने पण म्हणायला हवे. मग मी तरी तुला का खाऊ असे दुर्लक्ष आपण पण करायला हवे. असे काही घडले की चिवड्याची खूमारी अधिक वाढते. तर असा चिवडा खसकन डबा ओढुन वसकन  मिक्सरच्या भांड्यात ओतावा. खर्रकन मिक्सरचा कान पिळुन चिवड्यातले दाणे  कढीपत्ताा डाळे मिरच्या या सह तो मिक्सरमधून बारीक दळावा. परातीत घेऊन त्यात वाटीभर बेसन व वाटीभर कणीक बचकभर तिखट चिमूटभर हळद चवीनुसार मीठ कचाकचा कापलेला कांदा घालून वचकटपणे मिसळावे. शेतकर्यांच्या संपामुळे 20 रू ला 20 काड्या मिळालेल्या कोथिंबिरीच्या काड्यातल्या 5/6 काड्या ओढून कराकरा चिरून त्यात घालाव्यात.  पाणी घालून लेकराला जितक्या मायेने गोंजारतो तसे गोंजारून गोळा मळावा.  धपकन तवा ठेऊन त्यावर सर्रकन तेल ओतावे. मग थालिपीठाचा गोळा त्यावर ठेवून नवर्याने सांगितलेली भा...