Skip to main content

Posts

Meaning of Panduranga Vitthala

What is the meaning of Panduranga Vitthala ? Sri Sri Ravi Shankar explains the meaning of Pandurang Vitthala as “ Pandu is the five elements. The whole world is color of the five elements: Earth, Fire, Water, Wind, and Space. This world, which is made up of the elements, is a stage. The person who is dancing on this stage is Pandu. The one who is still, non-moving is Vitthala. ‘Thal’ means that which is changing and which moves. Atal or Vitthal means that is specially still. Your body is Panduranga. It is made up of the five elements. The soul (atma) is Vitthala. Vitthala, the word, means the one who is still. The one who does not move, but moves others. The one who is still. And the one who is the base or root. This is called Vithhala.

मृत्यू का येतो ?

*मृत्यू का येतो ?*         --------------------        जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे.               _*संत ज्ञानेश्वर*_        या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा  नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या,  होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह  निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.     _*मृत्यू कधी येतो ?*_ मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो. या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास  सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला  एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही.  सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले  प्रारब्ध आपल्याला बदलता येते...

गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे

एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली.. वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते. गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते. थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला , मी तर या  जंगलाचा राजा आहे;  माझा कोणी मालक नाही;  मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची  नाही.  वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की . तेव्हा गाय त्याला हसून म्हण...

आषाढी_एकादशी निमित्ताने आपण या दिवसाशी निगडित धार्मिक महत्व असलेल्या वृक्षांची माहिती.

आज '#आषाढी_एकादशी' आजच्या दिवसाचे धार्मिक महत्व महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही. या दिवसाच्या निमित्ताने आपण या दिवसाशी निगडित धार्मिक महत्व असलेल्या वृक्षांची माहिती करून घेऊ.          संतशिरोमणी ज्ञानदेवांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी आळंदीला संजीवनी समाधी घेतली. असे म्हणतात की, त्यावेळी त्यांनी हातातला दंड [ काठी ] मातीमध्ये रोवला आणि ते समाधी विवरामध्ये गेले. त्या दंडाने मूळ धरले आणि त्याला पालवी फुटून कालांतराने त्याचा वृक्ष झाला. तोच हा #अजानवृक्ष ! संत नामदेव म्हणतात -                                                              अजानवृक्ष आरोग्य अपार समाधीसमोर स्थापियेला I कोरडया काष्ठी फुटीयेला पाला  तेव्हा अवघीयाला नमस्कारी II                   संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीस्थानी असलेला अत्यंत पूज्य आणि पावन समजला जाणारा अजानवृक्ष जन...

कांदे नवमी २९.६.२०२० / चातुर्मास कसा पाळायचा

आज कांदेनवमी आहे रे ब्वाॅ. त्या निमित्त  *कथा नवमीच्या कांद्याची*  आषाढी नवमीला (एकादशीच्या दोन दिवस आधी) या मोसमातले कांदे खाऊन संपवायचे. त्यांचे विविध प्रकार करायचेत. कांद्याच्या चकल्या (खास त्यासाठी आमचे आजोबा, काकेआजोबा, काका, मावसोबा आपापल्या धर्मपत्न्यांना, लेकी सुनांना उन्हाळ्यातच थोड चकलीच पीठ खास ठेवून द्यायला लावायचेत.) कांद्याची भजी, कांदेभात, कांद्याची थालीपीठ, कांद्याच पिठल हे सगळे पदार्थ. विदर्भात काही वर्षांपूर्वी तरी मोठ्या उत्साहात ही कांदेनवमी होत असे. अजूनही ग्रामीण विदर्भात होत असेल. शहरे मात्र सगळी आता "मेट्रोज" झाल्यामुळे तिथले खाद्यसंस्कार बदलणे अपरिहार्य आहे. आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास सुरू होतो त्यात कांदे, लसूण, वांगी इत्यादी पदार्थ बर्‍याच घरांमधून खाण्यासाठी वर्ज्य होतात. म्हणून मग मोसमातला शेवटचा कांदा, नवमीलाच खाऊन घ्यायचा हा या प्रथेमागचा उद्देश. मग "चातुर्मासात कांदा वगैरे पदार्थ वर्ज्य का ?" या विषयावर आमच्या बालपणी आम्ही उगाचच हुच्च्पणाने घरातल्या वडीलधार्‍यांशी घातलेला वाद आठवला.  तरूण वयात "वातूळ" शब्दाशी परिचय झालेल...

रामरक्षेची कथा

*रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ?*  *"तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्र विषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे.*  *ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरां कडे ते प्राप्त करण्या साठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्या मध्ये खूप वाद झाले.* *शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वां मध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली.* *ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडे च ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्याना साठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचा...

आठ आण्यातलं लग्न

आठ आण्यातलं लग्न (महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला आज १२ जून रोजी वीस वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या लग्नाची ही कथा). साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात 'ओरिएंट हायस्कूल' नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने (पु.ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळाने मीही! भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना. (तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.) शिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग 'आपण लग्न करूया' असा भाईचा आग्रह सुरू झाला... वाढतच राहिला. लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. समजा, उद्या आपलं पटेनासं झालं, तर लग्नात 'शुभ मंगल सावधान' म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करण...