Skip to main content

Posts

कृष्ण

*कृष्ण*,,, नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव,,, प्रत्येक शब्द हा जोडाक्षर,,, जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण,, पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा,, जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा,, दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण,, सातवा अवतार प्रभू राम,, *राम* ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ,,मर्यादेत,, म्हणून *मर्यादा पुरुषोत्तम*,,, रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही,, तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले,त्याच्यावर टीका केली,,, मग पुढच्या अवतारात प्रभू ने सर्व मर्यादा ओलांडल्या,, करा काय करायचं ते,,,😃😃😃 जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा,, कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये,, कृष्ण म्हणजे *श्रीमदभगवद्गीता*,,, जीवनाचं सार,,, प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला,, जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं,, गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला,,, म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती, कृष्ण 8 वर्षाचा होऊ पर...

वेडी माणसे

वलयांकित... वेडी माणसे..! 🌹 कोणी रायगडचा, कोणी तिरंग्याचा वेडा. ..करा थोडा वेडेपणा ! रायगड १००० वेळा चढून जायचा पण कोणी करेल का.? पण श्री. सुरेश वाडकरांनी  तो केला आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात.तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात. गडावर गेल्यावर प्रत्येक स्थानाची, बुरुजाची माहिती सांगतात.  ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते. ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात.  एक  जेधे नावाच्या तरुण आहे. .. हा तरुण २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो...

आठवणितले दिवस..

आठवणितले दिवस....! पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत *कॅल्शियमची* कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.  अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक *चावून* झेललं होतं  पुस्तकामध्ये *झाडाची पानं* आणि *मोरपिस* ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा *दृढ* विश्वास होता. कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा *शिरस्ता* हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक *वार्षिक उत्सव* असायचा. आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी *फिकीर* नव्हती आणि ना हि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा *बोजा* होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या *शाळेकडे* वळत नव्हती. एका मित्राला सायकलच्या पुढच्या *दांड्यावर* व दुसऱ्याला मागच्या *carrier* वर बसवून आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही. बस्सं!......काही *धूसर* आठवणी उरल्यात इतकंच.......!! शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा *'ईगो'* कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला *'ईगो'* काय असतो हेच ...

आठवणीतील कविता

१. ।।आठवणीतील कविता ।।  दहा दिवस दहा कविता  3 जुलै 2020      नमस्कार!  मी वृंदा अरविंद जोगळेकर.  आज माझ्या  आठवणीतील  आवडती कविता सादर करीत आहे.मला या उपक्रमात माझी मैत्रीण वर्षा विजय देशपांडे हिने आमंत्रित केले आहे आणि मी माझी मैत्रीण अनघा नासेरी हिला  या उपक्रमात सहभागी  करतेय. या उपक्रमातील  माझी ही पहिलीच कविता आहे आजची माझी पहिली कविता म्हणजे संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे .  आकाशातले काळे दाट मेघ आषाढ महिन्याची नांदी देतात आणि चंद्रभागेच्या काठावर विठ्ठलभक्त जमू लागतात. गोपीचंदनाची उटी आणि तुळशीच्या माळांचा साज चढवलेले हे वारकरी विठ्ठलाचे नामस्मरण करताना टाळ-मृदंगाच्या तालावर देहभान विसरतात. राग-लोभ, मोह-माया यांच्या पलिकडे जाऊन केवळ भक्ती हाच भाव प्रत्येकाच्या मनात उरतो. रंग-रूप, जात-पात, लहान-थोर, उच-नीच कसलाही भेदच उरत नाही. सारा आसमंत विठोबामय होतो. निर्मळ भक्तीची ही पायवाट हा भवसागरातून आपल्याला तारून नेईल असा विश्वास तुकोबा प्रत्येकाच्या मनात जागवतात.  यंदा पंढरीची वारी होऊ शकली नाही. पण हे चित्र प्रत्य...

फुंकर

*फुंकर* चुलीतल्या धुमसत्या लाकडांवर फुंकर घातल्यास त्यातून आगीच्या ज्वाला पेटतात ज्याने अन्न शिजते. कुणाच्या भाजलेल्या त्वचेवर अथवा जखमेवर फुंकर घातल्यास तिथला दाह कमी होतो. शाळेत कधी डोळ्यात काही पडलच तर बाजूची मैत्रीण तिच्या चिमुकल्या हातांनी डोळा मोठा करत त्यावर फुंकर घालायची जेणेकरून डोळ्यात पडलेला कण उडून जायचा. कुणाच्या दु:खावर मायेच्या आश्वासक शब्दांची फुंकर घातल्यास त्या व्यक्तीस दु:ख सहन करण्याची,त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळते. नवथर तरुणीच्या अल्लड बटांवर तिच्या प्रियकराने घातलेली हलकीशी फुंकरही तिच्या कायेत रोमांच फुलविते.  आठवणींच्या  वहीवर फुंकर घालताच अनेक आठवणी पिंगा घालतात. आठवणींची साखळीच तयार होते. अन ही गुंफण तजेला देते. गरमगरम कॉफीचा फुंकर घालून आस्वाद घेण्याचा नाद वेगळाच.  लहानपणी लाजरीच्या पानांवर हळूवार फुंकर घालून ती मिटताना पहाणं हाही एक नादच होता. बशीतला गरम चहा एकाकडेने आजी/आई धरते व दुसऱ्या कडेने बाळ बशीला गच्च पकडते. मग आई हळूवार फुंकर घालते चहावर जेणेकरून बाळाच्या जीभेला चटका लागू नये. ते पाहून बाळाला अजून मजा येते. बाळपण मग फुर्र फुर्र करत...

८ जुलै १९१० चे महत्व / The mystery behind Veer Savarkar's escape from British custody.

ही अशी उडी बघताना । कर्तव्य मृत्यू विसरला ॥  बुरुजावर फडफडलेला । झाशीतील घोडा हसला॥ १॥  वासुदेव बळवंतांच्या । कंठात हर्ष गदगदला ॥  क्रांतीच्या केतूवरला । अस्मान कडाडून गेला ॥ २ ॥  दुनियेत फक्त आहेत । विख्यात बहाद्दर दोन ॥  जे गेले आईकरिता । सागरास पालांडुन ॥ ३ ॥ हनुमंतानंतर आहे । या विनायकाचा मान ॥  लावुनिया प्राण पणाला । अस्मान कडाडून गेला ॥ ४॥  ८ जुलै १९१० रोजी मार्सेलिस बंदरात विनायक दामोदर सावरकरांनी बोटीतून मारलेली त्रिखंडात गाजलेली ऐतिहासीक मार्सेलिसची उडी- अर्थातच साहसदिन : स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏🙏 आजचा दिवस त्या स्मरणाचा. The mystery behind Veer Savarkar's escape from British custody NRI researcher claims freedom fighter's bid to escape from British custody in France was foiled by two Indians. An NRI researcher has exposed a neatly maintained lie by the British government regarding the arrest of Vinayak Damodar Savarkar in France on July 8, 1910, when the revolutionary escaped from their custody by leaping ...

गुरू पौर्णिमेला व्यास पौर्णिमा पण म्हणतात

*आज गुरुपौर्णिमा आहे त्यावर लिहिण्या चा प्रयास* *प्रथम आपण गुरुपौर्णिमा याचा अर्थ पाहू पौर्णिमा म्हणजे चंद्राचा पूर्ण उदय म्हणजे प्रतिपदे पासुन ते चतुर्दशी या तिथींचे विलीनीकरण म्हणजेच चंद्राचा पूर्ण उदय कसे सोळा कलानी चंद्राचे अस्तित्व असणे कला म्हणजे ब्रम्हाची शक्ती* *आता आपण सोळा कला कोणत्या त्या पाहु कामकर्षणी बुध्या कर्षणी अहंकार कर्षणी शब्दा कर्षणी स्पर्शा कर्षणी रूपा कर्षणी रसाकर्षणी गंधाकर्षणी चित्ता कर्षणी धैर्या कर्षणी स्म्रुत्या कर्षणी नामा कर्षणी बिजा कर्षणी आत्मा कर्षिणी अमृता कर्षणी शरीरा कर्षणी* *आता चंद्राच्या कला म्हणजे शक्ती आणि आषाढी पौर्णिमेलाच गुरू पौर्णिमा येते त्याचे कारण चंद्र म्हणजे मनाचे प्रतीक आहे आणि मन हे चंचल आहे कारण चंद्र हा पौर्णिमेस पूर्ण खिलतो म्हणजे स्थिर होतो व परत प्रतिपदे पासून क्षीण होतो तो थेट आमव्यसा पर्यंत तसेच मनाचे आहे कधी स्थिर तर कधी चंचल* *दोन आयन असतात उत्तरायण व दक्षिणायन उत्तराण्यायात तुम्ही साधना करतात त्यामुळे तुमची प्रगती होते व दक्षिणायनात साधना करतात त्यामुळे तुमची पाप कर्मे क्षीण होतात* *आषाढी पूर्णिमे पासून संन्याशी लोकांचा चातु...