Skip to main content

Posts

Story of JRD Tata and Aspy Engineer.

*TODAY ON FRIENDSHIP DAY* When JRD Tata was just 25 years old, an interesting news item in the London Times newspaper caught his attention. A unique air race had just been announced, by His Highness The Aga Khan, spiritual leader of the Shia Imami Ismaili Muslims, to popularize aviation and flying in India. The announcement read : “The Aga Khan has offered through the Royal Aero Club, a prize of UK Pounds 500, for the first flight from England to India, or vice-versa, by a person of Indian nationality. It must be a solo flight, completed within six weeks, from the date of starting. The prize will remain open for one year from 1st January 1930.” JRD Tata was already an avid flyer, and he had just obtained his flying license earlier that year. Since he was the first person to have qualified in India, his license, issued by the Aero Club of India and Burma, proudly bore the number “1”. He was now excited by the Aga Khan Prize, and decided to take up this flying challenge. India to England...

इंद्रधनुषी हमिंगबर्ड

*निसर्गातला हा चमत्कार टिपण्यासाठी तो १९ वर्षे अडून राहिला...* जगातला आकाराने सर्वात लहान पक्षी हा बहुमान 'हमिंगबर्ड' म्हणजेच 'गुंजन' पक्ष्याला मिळाला आहे.  सकाळच्या प्रहरी याच दिसणं म्हणजे दिवस शुभ जाण्याचा संकेत असतो असं बऱ्याच ठिकाणी मानलं जातं! फक्त  ३ ते ४ इंचाच्या या टीचभर आकाराच्या पक्ष्याला निसर्गाने एक वेगळंच देणं दिलं आहे आणि ते म्हणजे या हमिंगबर्डच्या पंखांतून जेव्हा सूर्यप्रकाश  जातो, तेव्हा त्याचे पंख अद्भुत अशा इंद्रधनुषी सप्तरंगांनी झळाळून उठतात.  या दुर्मिळ आणि अद्भुत प्रसंगाचं चित्रण करण्यासाठी एका फोटोग्राफरने थोडी-थोडकी नव्हे, तर आपल्या आयुष्यातली तब्बल १९ वर्षें खर्ची घातली आहेत. त्या फोटोग्राफरचं नाव आहे ख्रिस्तीयन स्पेन्सर!! हमिंगबर्ड जरी दिसायला लहान असला तरी तो ताशी जवळपास ५४ किलोमीटरच्या वेगाने उडू शकतो! एवढंच नाही, तर एका सेकंदात आपले पंख ८० वेळा फडफडवू  शकतो. पण त्याच्या पंखातून इंद्रधनुष्यी आविष्कार टिपण्यासाठी तो सूर्याच्या समोर असणेसुद्धा आवश्यक आहे. यावरून तुम्हाला ख्रिस्तीयनची कामगिरी किती कठीण असेल याचा अंदाज येईल! हा...

मनातले बोल

१.  खळाळत्या नदीतीरी सांज झाली ग उनाड मनी माझ्याही उधाण , जणू फेसाळ सागर ! हात लागती आभाळा  चित्त क्षितिजापल्याड ! भेटतील दोन तीर होती मोकळी कवाडं हिरवाई उधळून मन माझही लबाड !!!               सौ लतिका गांगल २. कोपरा एक किंचितसा काजळलेला , आठवांचे साठव होऊन जरा जळमटलेला संधीप्रकाशात कुठेसा हरवलेला , ना दिवा ना पणती काहीसा विझलेला !    गतस्मृतींच्या कॅलिडोस्कोपने सांधलेला      नाजूकसा एक  सांधा     काहीसा निखळलेला !      दोस्तीतल्या रुसाव्याफुगव्यांनि            थोडा भागलेला ,           अनामिकेने अबोला तर  दोन बोटांच्या मिठीने रुसवा                  संपवलेला !  कोपरा तो एका अनामिक ओढीने              व्यापलेला  शैशव चांदण्यांनी आता            उजळलेला  नको साद पुनवकौमुदिस आता        असे...

विड्याचे पान

🚩💚शुभकार्यात का महत्वाचे मानले जाते विड्याचे पान💚🚩 घरात कोणतेही शुभकार्य असेल तर पहिला उल्लेख केला जातो तो विड्याच्या पानाचा. घरात पूजा किंवा लग्न, साखरपुडा यांसारखे शुभकार्य असेल तर अनेकदा भटजीबुवा पहिला प्रश्न विचारतात विड्याची पाने कुठे आहेत?  या विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्येही नाही तर इतर धर्मांतील लोकांमध्ये विड्याला महत्व आहे.  बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याचे घेऊन मंडपात आणले जाते तर तेलुगु, बिहारी, पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात.   मात्र आपल्यापैकी कित्येकांना हे विड्याचे पान का वापरले जाते असे विचारले तर कोणी ठामपणे सांगू शकणार नाही. 💚🚩विड्याच्या पानामागची धार्मिक कथा:🚩💚 समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप...

लाईबी ओइनम, मणिपूर

कुठून आणतात, या साध्यासुध्या भारतीय महिला हे अदभूत धैर्य, कमालीचा कणखरपणा, अतुलनीय चिकाटी आणि स्वयंस्वीकृत काम सक्षमपणे निभावून नेण्यासाठी कंबर कसून घेतलेली पराकोटीची जिगरबाज मेहनत यांच्या अंगात.......  लाईबी ओइनम, मणिपूर मधल्या इंफाळमधली एक साधीशीच, गरीब पण अफाट जिद्दी पन्नाशीतली भारतीय कर्तुत्ववान स्त्री.... ३१ मे २०२० चे संध्याकाळचे पाच वाजलेले.  कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने आणि काही म्हणजे काहीच सुरु नसल्याने गिर्हाईकचं नसल्याने, दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत असलेली लाईबी ही पाच सीटर ऑटो रिक्षाचालक रस्त्याच्या शेजारीच सुकवलेल्या खाऱ्या माश्यांचा छोटासा ढीग गोणपाटावर टाकून गिऱ्हाइकांची वाट बघत बसली होती.  गेली दहा वर्षे इंफाळमध्ये पहिली रिक्षाचालिका म्हणून कष्ट करून कुटुंबाचे कसेबसे उदरभरण करणारी लाईबी तिच्या दोन मुलं आणि डायबेटिक दारू पिणारा नवरा असलेल्या घरातली कमावणारी एकमेव सदस्य. आणि त्यामुळेच लॉक डाऊन असल्याने आणि रिक्षा व्यवसाय बंदच असल्याने खारवलेले मासे विकत कशीबशी दोन वेळची चूल घरात पेटायची तिच्या. तितक्यात एक वयस्कर आणि प्रचंड थकलेले म...

माझे माहेर डोंबिवली

माझे माहेर डोंबिवली.  किती मस्त लिहिलंय....👌👌👌 माझ्या आठवणीतील डोंबिवली डोंबिवली एक निद्रिस्त खेडं होतं. येथे रेल्वे येताच गाव होण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्या काळात दोनच प्लॅटफॉर्म होते. असं सांगतात कि ते आजच्या सारखे उंच नव्हते. जमिनीवरच उतरावे लागे. तेव्हा वस्ती ही फार नव्हती तर गर्दी कुठून येणार? येथल्या भूमिपुत्रांची संख्याही कमी. तेव्हा तरी त्यांना ट्रेनची गरज भासत नव्हती. रेल्वे येताच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेने वसाहतीसाठी जागा दिली. तीच आज अवशेष स्वरुपात असलेले बारा बंगले आणि बावनचाळी. एके काळी विजेच्या चमचमाट्यानं चमकत होती. इंग्रजांनी ह्या गावाला डिमॉली असं नाव दिल. पुढे डिमॉलीच डोंबिवली झालं. एक महत्वाची आठवण म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर एकच्या पलीकडे म्हणजे डोंबिवलीच्या पश्चिमेकडे एक तळं होतं. त्यात घन:श्याम गुप्ते यांची एक होडी असायची. हे गुप्ते पुढे डोंबिवलीचे सरपंच झाले. ह्या गुप्त्यांनीच दिल्लीपर्यंत स.गो. बर्वे यांची मदत घेऊन बदलापूरहून नळाचं पाणी आणलं. डोंबिवली त्याकाळात किती निवांत होती हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकरांनी एके ठिकाणी सांगितलं आहे....

जिवती

जिवती... #जिवतीच्या_प्रतिमेचा_भावार्थ    मानवाला अनादी काळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं. यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजल्या जाऊ लागलं . असाच एक गूढ दार पिढ्यांनी पुजलं ते 'जिवती पूजन' या रूपात.  कोण ही जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जिवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? असे बरेच प्रश्न मनात रेंगाळत होते. यासंदर्भात मला जे काही कळलं ते  आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेखन प्रपंच.  आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच आजचं  दीपपूजन. आजची दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा...