Skip to main content

Posts

शौर्यदिन १०.६.२०२०

बाबासाहेब पुरंदरे बंगळूर मध्ये आले असताना त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यांना कोणीतरी विचारले की जशी Tennison ची कविता आहे तशी एखादी कविता मराठीत आहे का? तर बाबासाहेबांनी कुसुमाग्रजांची ही कविता शेअर केली.  सैनिकाचे इमान वर्तवणाऱ्या या कविता. दोन्ही कवितांचा आशय अंगावर काटा आणणारा आहे. मराठी कविता आहे' वेडात मराठे वीर दौडले सात'  आज शौर्यदिन…   आजच्याच दिवशी इ.स १६६०मध्ये महाराजांचे ७ मराठे लढले , आदिल शहाच्या १५०० माणसांबरोबर…       त्या सात योद्धांची नावे.….  १) विसाजी बल्लाळ २) दीपोजी राउतराव ३) विट्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धि हिलाल ६) विठोजी शिंदे ७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर वेडात मराठे वीर दौडले सात..... "श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात" वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥ ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताठर दील "माघारी वळणे नाही मराठी शील विसरला महाशय काय लावता जात!" वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥ वर भिवयी च...

घरातच राह्यन रे बाबू बाहेर हिंडतं काहून ?

बिन भाजीपाल्याचे कोरोना लॉकडाऊन स्पेशल गावरान वऱ्हाडी आयटम ——————————- घरातच राह्यन रे बाबू बाहेर हिंडतं काहून ? भेव नाही लागत काय हे आकोल्याची हालत पाहून ? असा कोनता तुह्यावाला झेंडू दाटून आला ? कायच्यासाठी पाह्यजे बे रोजच्या रोज भाजीपाला ? घरच्या घरीच करून पाह्यजो रोज एक एक ॲटम एकदा बी रिपीट नको करू तब्येत राहीन टमाटम आपले गावरान जिन्नस भल्ले मस्त पचतात ईनाकारन कोरोनात तुले चोचले जिभीचे सुचतात बरी हाय ना पध्दत बाबू आपली साधी हे घे पाठोतो तुले तीस दिवसाची यादी बेसन ऊर्फ चुन ताकातलं बेसन भडगोये कळीगोये मोकयं बेसन पातोळी  खांडोळी कांद्यातले कनोर वळ्या कयन्याच्या वळ्या करोळा सेवभाजी कांदयाची भाजी मुंगाची दाय उळदाची दाय चवळीची दाय मठाची दाय तुरीचं वरण तुरीचं वरण फोळणीचं मुंगाचा गोया उळदाचा गोया पापळाचा खुळा सयतवेल दाय लाल मिरचीची चटणी हिरवा ठेचा लसणाची चटणी शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची पतली भाजी  सार हरबऱ्याच्या दायीची चटणी वरण भात खिचळी तुरीची खिचळी मुंगाची फोळणीची खिचळी फोळणीचा मसाला भात खिर पुरी कयण्याची भाकर दुध भाकर गुळपोयी रोडगे बाफले बिट्टया चुरमा शिरापुरी गुलगुले भज्याईची भाजी म...

सारस्वत मासे खाऊनही पवित्र ब्राह्मण कसे ?

👇🏻👇🏻 नक्की वाचा कथा.👇 दधीचि ऋषी आणि अलंबुजा अप्सरा यांचा मुलगा सारस्वत. इंद्राच्या सवयीनुसार दधीचीच्या तपश्चर्येत व्यत्यय आणण्यासाठी त्याने अलंबुजेला दधीचीकडे पाठविली होती. ती सरस्वतीच्या पात्रातून बाहेर आली. दधीचि तिथे स्नानासाठी आला होता. अलंबुजेने त्याला काममोहित केले. तपश्चर्या त्याने अर्धवट सोडली. तिच्याभोवती पिंगा घालण्यातच त्याचे दिवस जाऊ लागले. काही महिन्यांनी अलंबुजेला मुलगा झाला. त्याला दधीचिपाशी ठेवून ती स्वर्गात निघून गेली. ती सरस्वतीतून आली होती व तेथेच त्यांची प्रथम भेट झाली होती. या प्रसंगाची आठवण म्हणून दधीचिने मुलाचे नाव ठेवले *सारस्वत*. दधीचिने त्याला वाढवले व वेद-वेदांग-शास्त्रांत पारंगत केले. दधीचीने देवांना आपली हाडे देण्यासाठी प्राणत्याग केला. त्यानंतर देशाला अवर्षणाने ग्रासले. अन्नपाण्यासाठी लोक सैरावैरा भटकू लागले. ऋषीही तेच करू लागले. पठणासाठी त्यांना वेळ मिळेना. त्यामुळे त्यांचे ज्ञान पूर्ण हरवले. एकटा सारस्वत मात्र समुद्राकाठी राहिला. मासे खाऊन त्याने जीव जगवला. समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचे गोडे पाणी तो पीत असे. दुष्काळ संपला. आपले ज्ञान विस्मृतीच्या पड...

*बायकांकडून नव-यांना संबोधण्या बाबतचा इतिहास तुम्ही वाचलाच पाहिजे*

न्या. रानडे यांच्या घरी एकदा कोणी   गृहस्थ आले. न्यायमुर्ती घरी आहेत का विचारलं. रमाबाई म्हणाल्या, *"खुंटीवर पगडी दिसत नाहीये."* त्या माणसाला काही कळलं नाही.  त्याने परत विचारलं. रमाबाई म्हणाल्या, *"जोडेही दिसत नाहियेत."* तरिही त्याला कळलं नाही त्याने पुन्हा तेच विचारलं. रमाबाई म्हणाल्या, *"कोपऱ्यात काठीही दिसत नाहिये."* *ते घरी नाहियेत हे सांगण्याची ही त्या काळची पद्धत झाली.* नावाने सोडाच पण *"हे"* वगैरे उल्लेखही केला जात नव्हता त्या काळी. *का. पु. स. (काळ पुढे सरकला)* ..... नवर्‍याचा उल्लेख *"इकडुन येणं झालं"*, तिकडुन सांगणं झालं *"इकडची स्वारी"* असा होऊ लागला. मऱ्हाटी शिणुमात *"एक माणुस रागावलंय जणू आमच्यावर"* असा लडिवाळपणा झरु लागला. *का. पु. स.* ..... नवर्‍याचा उल्लेख *अहो, माझे यजमान, माझे मिस्टर असा होऊ लागला*. *का. पु. स.* ..... नवर्‍याला चारचौघांच्यात *अहो*, तर *एकांतात लाजत लाजत अरेतुरे* सुरु झालं. याशिवाय  *खाशा स्वाऱ्या, घरधनी, कारभारी, मालक, पप्पुचे पप्पा, बंटीचे बाबा, अहो नारायण* हा एक समांतर प्रवास चाल...

भारतीय संस्कृती

*1) अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?* *Infections spread टाळण्यासाठी.* *2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?* *Infections spread टाळण्यासाठी.* *3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?* *(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)* *कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.* *त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.* *या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.* *काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.* *त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.* *इथे कारण उलटे असते* *कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.* *4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?* *आलं का logic लक्षात.* *5) शौचा...

*तरुण वयात नामस्मरण का करावे ...?*

 *तरुण वयात नामस्मरण का करावे ...?* तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तुत्व करेल त्याच कर्तुत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते. कारण ह्या वयात मुले हुशार असतात matured असतात.तरुण रक्त अंगात सळसळते. ह्या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त होवून ह्या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात *नामस्मरण* करायचे असते.म्हातारपणी **नामस्मरण** होत नाही कारण त्यांनी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालविलेले असते. त्यामुळे त्यांच्या कडून *नामस्मरण* झाले तरीही ते देवाला पोहचते. पण दैवीशक्ति त्यांना मिळत नाही. तर ही शक्ती तरुण वयातच मनुष्याला मिळते. *नामस्मरण* हे तरुंणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृत असते.त्या *नामस्मरणाच्या* अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ती मिळते.नामस्मरण का कारायचे असते? कारण तरूण वय हे अल्लड़ असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते मग त्या मनाला व विचा...

T S Vahini

                                                                     🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                                                                 🙏🏻🙏🏻Shradhanjali 🙏🏻🙏🏻 Back home after attending T S Vahini's 13th day rituals and took charge of the my house hold chores. Met many near and dear relatives yesterday. The day got busier with family, friends, puja-patha and the food prepared. Sometimes it sounds so mechanical to get caught in such customs we follow year after years, not really giving enough thought to it, but the number of attendees during these days gives you how the departed soul has lived and invested in these relations...