Skip to main content

Posts

‘श्यामची आई’ च्या मागचे आचार्य अत्रे

साने गुरुजी यांनी 'श्यामची आई' च्या रूपाने संस्कारांचा अनमोल ठेवा लिहून ठेवला . काही पिढय़ा या पुस्तकाने संस्कारक्षम झाल्या. पुढे याच नावाने आचार्य अत्रे यांनी  चित्रपट काढला. अतिशय विलक्षणपणे त्यांनी चित्रपटासाठी प्रसंग निवडले. हसत्या खेळत्या अशा प्रसन्न वातावरणामधून त्यांनी हळुवारपणे प्रेक्षकांना शोकात्म वातावरणामध्ये नेले आणि तिथेच आपली पकड घट्ट करून मध्यंतरानंतरचा चित्रपट थेट मेलोड्रामाच्या दिशेने नेताना ते अजिबात कचरले नाहीत. ६ मार्च २०२० रोजी या चित्रपटास ६० वर्षे होतील. या निमित्ताने या चित्रपटात श्यामची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने जागवलेल्या आठवणी.. १९५३ मध्ये 'श्यामची आई'चे चित्रीकरण पूर्ण होऊन चित्रपट प्रकाशित झाला आणि त्या पाठोपाठ मला 'वहिनीच्या बांगडय़ा' या चित्रपटात भूमिका मिळाली. त्या चित्रपटाचेही चित्रीकरण मुंबईतच असायचे. 'श्यामची आई'ला सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि आचार्य अत्रे काळजीत पडले. कर्ज काढून त्यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती! आता काय करायचे? आणि एक दिवस मुंबईतच मला निरोप आला, की 'श्यामची आईच्या निमित्ताने गि...

हेमंत कुमार~ गायक, संगीतकार

*"याद किया दिल ने कहाँ हो तुम "- हेमंतकुमार* " हेमंत दा जब गाते हैं , ऐसा लगता है कोई साधू मंदिर में गा रहा हो " … असे यथार्थ उद्गार गानसम्राज्ञी लता मंगेशकरने हेमंतकुमार बद्दल काढलेले आहेत . तर प्रख्यात संगीतकार सलील चौधरींच्या मते देव जर कधी गायलाच तर त्याचा आवाज हेमंतकुमार सारखाच असेल . इथे मला वरचा आभाळातला देव म्हणायचाय हां . हो कारण आपल्या जमिनीवरच्या देवने (आपला देव आनंद हो)  तर आधीच पडद्यावर हेमंतकुमारच्या आवाजातली कित्येक गाणी अजरामर करून ठेवलीच आहेत .  तर आजच्याच दिवशी १६ जून ला १९२० साली महान गायक हेमंतकुमार मुखोपाध्याय (मुखर्जी) यांचा वाराणसी इथे जन्म झाला . म्हणजेच २०२० हे सुरु असलेलं साल हेमंतकुमारचं जन्मशताब्दी साल आहे .  संगीतकार अनिल बिस्वास , एस डी बर्मन , सलील चौधरी यांच्या प्रमाणेच हेमंतकुमारच्या संगीतावर देखील बंगालच्या रविंद्र संगीताचा प्रभाव पडलेला जाणवतो . हेमंतदांच्या संगीतात पूर्व भारतातील लोकसंगीत आणि शास्त्रीयसंगीताचा सुरेख मेळ आढळतो .   १९३५ साली वयाच्या पंधराव्या वर्षी All India Radio मध्ये हेमंतकुमारने आपलं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं आणि ...

शौर्यदिन १०.६.२०२०

बाबासाहेब पुरंदरे बंगळूर मध्ये आले असताना त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यांना कोणीतरी विचारले की जशी Tennison ची कविता आहे तशी एखादी कविता मराठीत आहे का? तर बाबासाहेबांनी कुसुमाग्रजांची ही कविता शेअर केली.  सैनिकाचे इमान वर्तवणाऱ्या या कविता. दोन्ही कवितांचा आशय अंगावर काटा आणणारा आहे. मराठी कविता आहे' वेडात मराठे वीर दौडले सात'  आज शौर्यदिन…   आजच्याच दिवशी इ.स १६६०मध्ये महाराजांचे ७ मराठे लढले , आदिल शहाच्या १५०० माणसांबरोबर…       त्या सात योद्धांची नावे.….  १) विसाजी बल्लाळ २) दीपोजी राउतराव ३) विट्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धि हिलाल ६) विठोजी शिंदे ७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर वेडात मराठे वीर दौडले सात..... "श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात" वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥ ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताठर दील "माघारी वळणे नाही मराठी शील विसरला महाशय काय लावता जात!" वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥ वर भिवयी च...

घरातच राह्यन रे बाबू बाहेर हिंडतं काहून ?

बिन भाजीपाल्याचे कोरोना लॉकडाऊन स्पेशल गावरान वऱ्हाडी आयटम ——————————- घरातच राह्यन रे बाबू बाहेर हिंडतं काहून ? भेव नाही लागत काय हे आकोल्याची हालत पाहून ? असा कोनता तुह्यावाला झेंडू दाटून आला ? कायच्यासाठी पाह्यजे बे रोजच्या रोज भाजीपाला ? घरच्या घरीच करून पाह्यजो रोज एक एक ॲटम एकदा बी रिपीट नको करू तब्येत राहीन टमाटम आपले गावरान जिन्नस भल्ले मस्त पचतात ईनाकारन कोरोनात तुले चोचले जिभीचे सुचतात बरी हाय ना पध्दत बाबू आपली साधी हे घे पाठोतो तुले तीस दिवसाची यादी बेसन ऊर्फ चुन ताकातलं बेसन भडगोये कळीगोये मोकयं बेसन पातोळी  खांडोळी कांद्यातले कनोर वळ्या कयन्याच्या वळ्या करोळा सेवभाजी कांदयाची भाजी मुंगाची दाय उळदाची दाय चवळीची दाय मठाची दाय तुरीचं वरण तुरीचं वरण फोळणीचं मुंगाचा गोया उळदाचा गोया पापळाचा खुळा सयतवेल दाय लाल मिरचीची चटणी हिरवा ठेचा लसणाची चटणी शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची पतली भाजी  सार हरबऱ्याच्या दायीची चटणी वरण भात खिचळी तुरीची खिचळी मुंगाची फोळणीची खिचळी फोळणीचा मसाला भात खिर पुरी कयण्याची भाकर दुध भाकर गुळपोयी रोडगे बाफले बिट्टया चुरमा शिरापुरी गुलगुले भज्याईची भाजी म...

सारस्वत मासे खाऊनही पवित्र ब्राह्मण कसे ?

👇🏻👇🏻 नक्की वाचा कथा.👇 दधीचि ऋषी आणि अलंबुजा अप्सरा यांचा मुलगा सारस्वत. इंद्राच्या सवयीनुसार दधीचीच्या तपश्चर्येत व्यत्यय आणण्यासाठी त्याने अलंबुजेला दधीचीकडे पाठविली होती. ती सरस्वतीच्या पात्रातून बाहेर आली. दधीचि तिथे स्नानासाठी आला होता. अलंबुजेने त्याला काममोहित केले. तपश्चर्या त्याने अर्धवट सोडली. तिच्याभोवती पिंगा घालण्यातच त्याचे दिवस जाऊ लागले. काही महिन्यांनी अलंबुजेला मुलगा झाला. त्याला दधीचिपाशी ठेवून ती स्वर्गात निघून गेली. ती सरस्वतीतून आली होती व तेथेच त्यांची प्रथम भेट झाली होती. या प्रसंगाची आठवण म्हणून दधीचिने मुलाचे नाव ठेवले *सारस्वत*. दधीचिने त्याला वाढवले व वेद-वेदांग-शास्त्रांत पारंगत केले. दधीचीने देवांना आपली हाडे देण्यासाठी प्राणत्याग केला. त्यानंतर देशाला अवर्षणाने ग्रासले. अन्नपाण्यासाठी लोक सैरावैरा भटकू लागले. ऋषीही तेच करू लागले. पठणासाठी त्यांना वेळ मिळेना. त्यामुळे त्यांचे ज्ञान पूर्ण हरवले. एकटा सारस्वत मात्र समुद्राकाठी राहिला. मासे खाऊन त्याने जीव जगवला. समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचे गोडे पाणी तो पीत असे. दुष्काळ संपला. आपले ज्ञान विस्मृतीच्या पड...

*बायकांकडून नव-यांना संबोधण्या बाबतचा इतिहास तुम्ही वाचलाच पाहिजे*

न्या. रानडे यांच्या घरी एकदा कोणी   गृहस्थ आले. न्यायमुर्ती घरी आहेत का विचारलं. रमाबाई म्हणाल्या, *"खुंटीवर पगडी दिसत नाहीये."* त्या माणसाला काही कळलं नाही.  त्याने परत विचारलं. रमाबाई म्हणाल्या, *"जोडेही दिसत नाहियेत."* तरिही त्याला कळलं नाही त्याने पुन्हा तेच विचारलं. रमाबाई म्हणाल्या, *"कोपऱ्यात काठीही दिसत नाहिये."* *ते घरी नाहियेत हे सांगण्याची ही त्या काळची पद्धत झाली.* नावाने सोडाच पण *"हे"* वगैरे उल्लेखही केला जात नव्हता त्या काळी. *का. पु. स. (काळ पुढे सरकला)* ..... नवर्‍याचा उल्लेख *"इकडुन येणं झालं"*, तिकडुन सांगणं झालं *"इकडची स्वारी"* असा होऊ लागला. मऱ्हाटी शिणुमात *"एक माणुस रागावलंय जणू आमच्यावर"* असा लडिवाळपणा झरु लागला. *का. पु. स.* ..... नवर्‍याचा उल्लेख *अहो, माझे यजमान, माझे मिस्टर असा होऊ लागला*. *का. पु. स.* ..... नवर्‍याला चारचौघांच्यात *अहो*, तर *एकांतात लाजत लाजत अरेतुरे* सुरु झालं. याशिवाय  *खाशा स्वाऱ्या, घरधनी, कारभारी, मालक, पप्पुचे पप्पा, बंटीचे बाबा, अहो नारायण* हा एक समांतर प्रवास चाल...

भारतीय संस्कृती

*1) अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?* *Infections spread टाळण्यासाठी.* *2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?* *Infections spread टाळण्यासाठी.* *3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?* *(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)* *कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.* *त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.* *या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.* *काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.* *त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.* *इथे कारण उलटे असते* *कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.* *4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?* *आलं का logic लक्षात.* *5) शौचा...