Skip to main content

Posts

कांदे नवमी २९.६.२०२० / चातुर्मास कसा पाळायचा

आज कांदेनवमी आहे रे ब्वाॅ. त्या निमित्त  *कथा नवमीच्या कांद्याची*  आषाढी नवमीला (एकादशीच्या दोन दिवस आधी) या मोसमातले कांदे खाऊन संपवायचे. त्यांचे विविध प्रकार करायचेत. कांद्याच्या चकल्या (खास त्यासाठी आमचे आजोबा, काकेआजोबा, काका, मावसोबा आपापल्या धर्मपत्न्यांना, लेकी सुनांना उन्हाळ्यातच थोड चकलीच पीठ खास ठेवून द्यायला लावायचेत.) कांद्याची भजी, कांदेभात, कांद्याची थालीपीठ, कांद्याच पिठल हे सगळे पदार्थ. विदर्भात काही वर्षांपूर्वी तरी मोठ्या उत्साहात ही कांदेनवमी होत असे. अजूनही ग्रामीण विदर्भात होत असेल. शहरे मात्र सगळी आता "मेट्रोज" झाल्यामुळे तिथले खाद्यसंस्कार बदलणे अपरिहार्य आहे. आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास सुरू होतो त्यात कांदे, लसूण, वांगी इत्यादी पदार्थ बर्‍याच घरांमधून खाण्यासाठी वर्ज्य होतात. म्हणून मग मोसमातला शेवटचा कांदा, नवमीलाच खाऊन घ्यायचा हा या प्रथेमागचा उद्देश. मग "चातुर्मासात कांदा वगैरे पदार्थ वर्ज्य का ?" या विषयावर आमच्या बालपणी आम्ही उगाचच हुच्च्पणाने घरातल्या वडीलधार्‍यांशी घातलेला वाद आठवला.  तरूण वयात "वातूळ" शब्दाशी परिचय झालेल...

रामरक्षेची कथा

*रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ?*  *"तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्र विषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे.*  *ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरां कडे ते प्राप्त करण्या साठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्या मध्ये खूप वाद झाले.* *शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वां मध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली.* *ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडे च ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्याना साठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचा...

आठ आण्यातलं लग्न

आठ आण्यातलं लग्न (महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला आज १२ जून रोजी वीस वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या लग्नाची ही कथा). साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात 'ओरिएंट हायस्कूल' नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने (पु.ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळाने मीही! भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना. (तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.) शिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग 'आपण लग्न करूया' असा भाईचा आग्रह सुरू झाला... वाढतच राहिला. लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. समजा, उद्या आपलं पटेनासं झालं, तर लग्नात 'शुभ मंगल सावधान' म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करण...

Wild imagination पदार्थांचे..

कॉलेज मधे असताना मैत्रिणी बरोबर ET ( Extra Terrestrial) नावाचा एक इंग्रजी सिनेमा पाहायला गेलो, खूप काही भव्यदिव्य अनाकलनीय पडद्या वर दीड तास पाहून बाहेर पडलो, एका वेगळ्याच विश्वात जाऊन परत आल्याचा साक्षात्कार झाला..त्यावेळी माझी मैत्रीण म्हणाली, "Americans really have a wild imagination! ". हे वाक्य माझ्या मनात कायम घर करून राहिले. आणि याची प्रचिती मला आमच्या ३ वर्षाच्या US वास्तवात; या प्रसंगाच्या तब्बल २५ वर्षा नंतर आली. ज्यावेळी आपण अगदी साधेसुधे विषय हाताळत होतो, त्यावेळी Americans,  ET सारखे विषय घेऊन सिनेमा बनवत.. आता सिनेमा आणि पदार्थ याचा काय संबंध असे वाटणे आपल्याला साहजिकच आहे. पण आज मीही असेच 'wild imagination' केले आणि हे - हे जिन्नस घातले तर होणारा पदार्थाची चव कशी लागेल, याचा अंदाज बांधला आणि मग तो कृतीत आणला..म्हणून तर कॉलेज मध्ये असताना पाहिलेल्या सिनेमा ची आठवण येथे सांगाविशी वाटली.. त्याचे असे झाले, करोना च्या साथीमुळे अनेक सल्ले आपसुक पहायला आणि ऐकायला मिळाले..काय करा आणि काय करू नका..एक ना दोन.. त्यात एका केरळी डॉक्टरांची मुलाखत ऐकली. त्यांच्या मते...

Alert

There you go My ears pop up As I hear some one whisper  I become alert  And I alarm you It's a quiet evening  And you are relaxing  Sometimes engrossed in work Or watching your favourite TV show You pay no heed to me, Sometimes even get mad at me Asking me to shoo away To maintain your peace of mind I am anxious for you And doing my job The job that defines me And perhaps you surely expect from me I am wondering now Utterly confused ... I have adjusted my world for you I do as you say I eat what you give But this one is my identity  Let me alarm you Let me disturb you I do so only when needed Maybe at the wrong time By Vandana Vilas Vaidya

पाना पानांचा राखा मान

तुळशीचे पान - विष्णूपदी स्थान.. बेलाचे पान - शंकरचा मान.. केवड्याचे पान - नागाचे स्थान.. रुईचे पान - मारुतीची शान.. केळीचे पान - भोजनाशी छान .. नागवेलीचे पान - गोविंदविड्याला छान.. मेंदीचे पान - शकुनाचा मान.. पळसवडाचे पान- द्रोणपत्रावळी छान.. पिंपळाचे पान - मुंजाचे स्थान.. गुलाबाचे पान - काटेरी छान.. कढीपत्त्याचे पान - फोडणीत स्थान.. आळूचे पान - अळूवडीला छान.. तमालपत्राचे पान - मसाल्याची शान.. वहीचे पान - लिहायला छान.. पुस्तकाचे पान - माहितीची खाण.. गवताचे पान - दवबिंदू शोभायमान.. ओव्याचे पान - सुवासिक छान..त्याला भजीत - मान.. तुळशीचे पान - स्मरणिशक्तीला महान.. कोरफडीच पान - त्वचेला छान... आपट्याचे पान-त्याला सुवर्णांचा मान.. आंब्याचे पान - तोरणाची शान..त्याला शुभ कार्यांत - मान🌱 🌿पाना पानांचा राखा मान पाना पानांची जगवा शान🌿🌳🌴🌳🌴🌳🌴 झाडे लावा झाडे जगवा  🤗😇🌲🌱⚘🌿🌾 -Ashutosh

MY SOUL HAS A HAT

 Beautiful poem by Mario de Andrade (San Paolo 1893-1945) Poet, novelist, essayist and musicologist. One of the founders of Brazilian modernism. __________________________ MY SOUL HAS A HAT I counted my years  & realized that I have Less time to live by,  Than I have lived so far. I feel like a child who won a pack of candies: at first he ate them with pleasure  But when he realized that there was little left, he began to taste them intensely. I have no time for endless meetings where the statutes, rules, procedures & internal regulations are discussed,  knowing that nothing will be done. I no longer have the patience  To stand absurd people who, despite their chronological age,  have not grown up. My time is too short:  I want the essence,  my spirit is in a hurry.  I do not have much candy In the package anymore. I want to live next to humans,  very realistic people who know How to laugh at their mistakes, Who are not infl...