Skip to main content

Posts

श्री दत्त अवतार परंपरा सविस्तर माहिती

श्री दत्त अवतार परंपरा सविस्तर माहिती... 1)श्री गुरु दत्तात्रेय... माता पिता - अनसूया/अत्रि. जन्म स्थान - माहुर (नांदेड ) निवासक्षेत्र - गिरनार (गुजराथ ) वेष - अवधूत  जयंती - मार्गशीर्ष शु.15 2)श्रीपादवल्लभ.... माता पिता - सुमती/अप्पलराज. जन्मस्थान - पीठापुर (आन्ध्र प्रदेश) निवासक्षेत्र - कुरगड्डी (कुरवपूर) कर्नाटक.  वेष - ब्रम्हचारी  जयंती - भाद्रपद शु. 4 3)श्रीनृसिंहसरस्वती.... माता पिता - अंबा./माधव. जन्मस्थान - लाड कारंजा  (वाशीम महाराष्ट्र ) निवासक्षेत्र - नरसोबावाडी, औदुंबर गाणगापूर.. वेष - संन्यासी  जयंती - पौष शु. 2 4)श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट.... माता पिता - ( --------- ) जन्मस्थान - कर्दळीवनात वारुळातून प्रगट. निवासक्षेत्र - अक्कलकोट (24 वर्षे ) वेष - संन्यासी दिगंबर जयंती - चैत्र शु. 2 ●पिठापूर, कुरवपूर, कडगंची, गाणगापूर व अक्कलकोट श्री स्थाने अतिशय पवित्र व जागृत आहेत. ●कुरवपूर येथे तर साक्षात श्रीपादवल्लभांनी 14 वर्ष अनुष्ठान केले आहे. ही जागा नामस्मरण, पारायणासाठी खूप चांगली आहे... श्रीगुरुदेवदत्त पादुका दर्शन हां दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा...

डिंकात डिंक धावड्याचा डिंक !

डिंकात डिंक धावड्याचा डिंक ! सोबतच्या छायाचित्रात जमा केलेला फक्त धावडा वृक्षाचा डिंक आहे , ज्याला डोंगरी भाषेत धांबुडा असे उच्चारले जाते ! डिंक विविध वृक्षांपासून मिळत असला तरी सर्वात किंमती व मौल्यवान म्हणून धावडा डिंकाला महत्त्व आहे . शहरात किती जणांना याची ओळख व गुणवत्ता माहीत आहे हे प्रतिक्रिया वरुन लक्षात येईल. ग्रामीण भागात मात्र बाळंतीण अथवा अशक्त व्यक्तीला सुंठवडा किंवा डिंक लाडू बनवणे गरजेचे असते तेव्हा एकमेव पसंती ही धावडा डिंकालाच असते ! शहरी भागातच नव्हे तर आमच्या सारख्या आठवडी बाजार ठिकाणी सुद्धा धावडा डिंक सांगून इतर वृक्षांचा डिंक त्यात मिसळला जातो . साधारण डिंक हा कुठेही रस्त्याकडेने सुद्धा उपलब्ध होतो पण धावडा वृक्ष बहूत करुन सपाट मैदानापेक्षा डोंगर माथा , उतरण किंवा दऱ्यातच सापडतोइ त्यामुळे खूप भटकंती व कष्ट पडत असल्याने विकताना बराच महाग विकला जातो ! - रवींद्र मुंडे Bhir, Maharashtra.

भोंडला

भोंडला-एक आठवण ©®  माधवी समीर जोशी, ठाणे नवरात्र जवळ आले की  वेध लागतात ते भोंडल्यांचे. मागच्या वर्षी एका सामुदायिक भोंडल्याला गेले होते . भल्यामोठ्या मैदानात भोंडल्यांचे आयोजित केला होता. तिथे  नटुनथटून बायका जास्त करुन आज्यांचीच गर्दी होती.काही बरोबर आपल्या सुना आणि नातीना घेऊन आल्या होत्या.भोंडल्याची गाणी ध्वनीमुद्रित लावली होती, फेर धरला होता.सगळं कसं छान होतं पण काहीतरी हरवून गेले आहे असे वाटलं त्यात काय नव्हते ते आपलेपणा. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.* हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो .याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदल...

रसवंती गृहांची नावे कानिफनाथ, नवनाथ’ का असतात?

*🔸रसवंती गृहांची नावे कानिफनाथ, नवनाथ’ का असतात?* *प्रत्येक गावातल्या स्टँडवर आठवडीबाजाराच्या ठिकाणी नवनाथ रसवन्तीगृह असतेच, कधी कधी कानिफनाथ रसवंतीगृह असं नाव असतं.* *आमच्या शेजारी एक जेरेशास्त्रीबुवा असतात. आमच्या चर्चेचा आवाज वाढला की ते आम्हाला शांत बसवायला येतात आणि स्वतःचं ज्ञान वाटून जातात तर हे जेरे आजोबा आम्हाला म्हणाले,* *ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली आहे ! त्यामुळे ही खरे तर लोककथा आहे आणि भाव तिथे देव या न्यायाने कनिफनाथाना ऊस, रस, गूळ आवडतो. इतका सिंपल अर्थ आहे. दत्तसंप्रदायाची नाथसंप्रदाय ही शाखा आहे, त्यामुळे नवनाथ रसवंती, कानिफनाथ रसवंती ही नावे ठेवण्याचा प्रघात पडला असावा, आणि तो जनमानसात रुळला.* *कन्फ्युजन वाढत चाललं होतं. खरं खोट काहीच कळेना. अखेर आम्हाला आठवलं, आमच्या कॉलेजमध्ये आमचा एका दोस्त होता नवनाथ जगदाळे. त्याच्या वडीलांचं रसवंतीगृह होतं. त्यांच्या दुकानाचं नाव सुद्धा नवनाथ होत. सुरवातीला तर आम्हाला वाटायचं, आमच्या नवनाथच्या नावावरून त्याच्या बाबांनी रसवंतीचं नाव नवनाथ ठेवलय. आता लक्षात आलं तसं काही नाही. आत...

२१ दिवस निद्रा

*  *आई तुळजाभवानी..... !* महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते. निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)केले जाते व विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते. असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमावाद्वितीय आहे मंचकी निद्रा:- देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे सर्व प्रथम मंचक म्हणजे काय ? मंचक याचा अर्थ पलंग असा आहे. देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी👇🏼 १)घोर निद्रा :- नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले या मुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात. २)श्रम निद्रा : घोर निद्रेतुन जागी होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाली नऊ दिवस आसुरांसोबत युध्द केले. नवव्या दिवशी आसूर शरण आला द...

महाभारताचे "नऊ सार सूत्र".

. *महाभारताचे "नऊ सार सूत्र".*  *१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल"  -कौरव.*                                     * *२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील."-कर्ण.*  *३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल."- अश्वत्थामा.*  *४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." -भीष्म पितामह.*  *५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" -दुर्योधन.*  *६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते."-धृतराष्ट्र.*  *७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे."  -अर्जुन.*  *८) ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...