Skip to main content

Posts

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ?

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास) पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ...

Incredible India.

#काशीराजकालीमंदिर,वाराणसी .उत्तर प्रदेश के लकड़ी पर नहीं, बल्कि पत्थर पर की गई नक्काशी है। पौराणिक #हिंदूमंदिरों में ऐसी उत्कृष्ट कलाकृतियों का खजाना है जो किसी भी अजूबे से कम नहीं लेकिन पता नही क्यो इन कलाकृतियों को वह पहचान नहीं मिली ?? #अतुल्यभारत #सनातन_धर्म #indianculture #indiancultures  #incredibleindia #hinduism #temple #Kashirajkali Temple,. Varanasi. Uttar Pradesh is not carving on wood, but on stone Mythological #Hindu Mandirs have a treasure of excellent artworks that are no less than any wonder. But I don't know why these artworks didn't get that recognition?? #अतुल्यभारत #सनातन_धर्म #indianculture #indiancultures  #incredibleindia #hinduism #temple

पंढरपूरची_भोपळ्याची_शेती

पंढरपूरची_भोपळ्याची_शेती          सतार व तंबो‍ऱ्याची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे भोपळे लागतात.‘ही दोन्ही वाद्ये तयार करण्यासाठी वापरला जाणारा भोपळा दर्जेदार असतो. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात भीमा, चंद्रभागेच्या तीरावरच्या वाळवंटी जमिनीत पिकवले जातात. हे भोपळे चवीला अत्यंत कडू असतात. नदीच्या काठावर काही मोजक्या गावांमध्ये या भोपळ्याचे पीक घेतले जाते. तेथील विशिष्ट हवामान, माती यामुळे हे भोपळे वजनाने हलके आणि बाहेरून टणक तयार होतात. त्यामुळे त्यातून मधुर सूर निर्माण होतो.         भोपळ्याच्या एका बीपासून सतारीपर्यंतचा प्रवास खूपच दिलचस्प असाच म्हणावा लागेल. सतारीसाठी जो भोपळा वापरला जातो तो मूळचा आफ्रिकेतला. आफ्रिकेतल्या आदिवासी जमाती याचा वापर मध, दारू, पाणी साठवून ठेवण्यासाठी करत. कालांतरानं इतर गोष्टींसारखाच तो भारतात पोहोचला. पंढरपूर जिल्हामध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. हा भोपळा वाढण्यासाठी आणि चांगला वाळण्यासाठी कोरडी जमीन आणि उष्ण वातावरण लागतं. चंद्रभागेच्या काठावरच्या बेगमपूर, सिद्धापूर या खेड्यांमध्ये याची प...

Chain carved in stone

The chain depicted in the picture is so realistic, but it is not of iron or any metal ; rather is carved in stone. The noteworthy point is... That when a such a chain is made of iron... All the rings are made separately and then fitted together... Though, if needed... the rings can again be pulled apart to open. ( In some cases welding may be done to avoid opening of the rings , but usually the rings CAN OPEN !!) Here... The CHAIN IS ENTIRETY CARVED IN STONE, SO HOW WERE THE RINGS FITTED TOGETHER TO FORM THE CHAIN ??!! I mean... at times... The spellbounding talent of the Hindu ancestors leaves one BEWILDERED & pleasantly AMAZED !! Also... Dumbfounded..

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...

अबय / पठारीच्या शेंगा

#अबईच्या_शेंगांची_भाजी 😋 ( अबय / पठारीच्या शेंगा) काल बाजारातल्या भाजीवाल्या मामीकडे जरा डोकावलो ... काय गो ? पालाभाजी सोडून काय हा ?? ह्या काय , करांदे कणगरा लालमाट सुरन नी अबयच्या शेंगांचो एक वाटो हा ... पाऊस जाऊन महिनो लोटलो , अजून खयची अबय ? जल्ली जगलेय एक बांदावर, पानी गावताय ना भाजीचा , फोफावलेय नुसती, देव काय ? दे वाईच, ह्या साली जाम रानभाज्या खाल्लंय, कोरोनाची कृपा ... कुसला नाव त्या कोरोनाचा, मेल्यान् नकोसा जीव केलानाय, जायचा नाव घेत नाय... जाईल गो जाईल, तो वरनं बगताय ना ... व्हय तर , ही घे अबय ... अशा नेहमीच्या संवादानंतर अबयच्या शेंगा घरी आल्या... खरं तर ही पावसाळी रानभाजी, पण पाणी मिळालं तर थंडीतही तग धरते नी पार उन्हाळ्यापर्यंत शेंगा देते... फरसबीच्या कुटुंबातली ही वेलवर्गीय वनस्पती. कोवळ्या शेंगांची सुंदर भाजी होते. शेंग मोडून चिरुन , दोर काढून शिजवायची नी मग कांद्यावर परता, पीठ पेरा, वाटण लावा नाहीतर भिजलेल्या चणाडाळीशी सूत जुळवा, अबय सगळ्यांबरोबर रमते नी उत्कृष्ट चवीची औषधी भाजी पोटात जाते ... आज कांद्यावर परतून पीठ पेरुन केलेली ही अबयची भाजी ... ©स्वानंद ज...

गगनजाई

#गगनजाई... 🌸🌸🌸 जाईच्या फुलांसारख्या पांढ-या रंगांची आणि जाईपेक्षा अधिक सुगंधी अशी ही आकाशाकडे झेपावणारी झाडं  म्हणून त्यांचं नाव #गगनजाई.निंबाच्या पानांसारखी पानं म्हणून दुसरं नाव #आकाशनिंब.तर याच्या खोडापासून काचेच्या बाटल्यांची बुचं बनवतात म्हणून तिसरं अगदी अरसिक आणि जास्त वापरातलं नाव म्हणजे #बुचाचं झाड.🙄लहानपणी घरापासून शाळेत जाताना वाटेत या फुलांचा सडा पडलेला असायचा.आम्हा मैत्रिणींच्यात का कोण जाणे पण या फुलांना पाटलिणीची फुलं असं नाव होतं.कदाचित त्या झाडांची मालकीण कोणीतरी पाटील आडनावाची बाई असावी.सकाळी सकाळी रस्त्यावरुन चालताना या फुलांचा सुगंध दरवळत नाकाशी आला की आपसुकच दोन्ही मुठीत मावतील इतकी फुलं गोळा करायची.सुट्टीच्या दिवशी वेचून घरी नेली की आई बोटांवर वळून त्याची छान वेणी करायची.इतर दिवशी शाळेत मैत्रीणींना वाटायची.त्याचे छोटे छोटे गुच्छ करुन वेणीत घालायचे.दुपारनंतर ती फुलं मऊ व्हायची.मग अलगद केसातून काढून पुढचा उद्योग सुरु व्हायचा.या पांढ-या शुभ्र किंवा किंचित गुलाबी छटा असलेल्या फुलांना पाच पाकळ्या असायच्या.तीन पाकळ्या स्वतंत्र तर चौथी आणि पाचवी एकमेकींना जुळ्या ब...