गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचे बोलकं वर्णन केलं जातं. त्याच भाषेत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय, त्याच्या पाठोपाठ म्हाताराही पडून गेला आहे. आता सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल. हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत. बहुधा प्रत्येक पाऊसनक्षत्रासाठी गावाकडे स्वतंत्र म्हणी आहेत. पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती (स्वाती नक्षत्रातला पाऊस पिकाला खर्या अर्थाने उभारी देतो, रूपरंग देतो. त्यामुळे या नक्षत्रात पाऊस झाला तर खर्या अर्थाने माणिक मोती पिकतात) पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा (चित्रा नक्षत्रातला पाऊस बिनभरवशाचा असतो. पडला तर इतका पाऊस पडतो की तो काहीच शिल्लक ठेवत नाही, अगदी वाडग्यात काढून ठेवलेलं उष्टावण असो की ताजं जेवण असो ते एकतर सादळून तरी जातं नाहीतर बेचव तरी होऊन जातं. म्हणून मग त्याची चव जाते. मग त्याचं वर्णन भात खाईना कुत्रा अशा शेलक्या शब्दात आलंय) , पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. काही खेड्यात गरदाडा असा ही शब्द आढळतो. त्याचा अर्थ खबदाड, भागदाड असा होतो. म्हणजे काय तर
माधुर्यम् अक्षरव्यक्ती: पदच्छेद: तु सुस्वर: । धैर्यम् लयसामर्थ्यम् च षडेते पाठका गुणा: । भाषेचा गोडवा, अक्षरांचे उच्चारण, शब्दांचा योग्य तो पदच्छेद - (योग्य ठिकाणी शब्द तोडणे, pause घेणे, जोर देणे वगैरे), सुस्वर - आवाजाचा गोडवा , धैर्य - धीटपणा / आत्मविश्वास, आणि लयसामर्थ्य - योग्य तो आवाजाचा चढ उतार आणि लय (monotonous नसणे), हे पाठकाचे - म्हणजे निवेदकाचे / गोष्ट सांगणार्याचे सहा गुण असतात / असावेत. मदन