Skip to main content

Posts

'घेशील किती दोन करांनी"

कॉपी/पेस्ट आहे. लिहीणा-याचे नाव उपलब्ध नाही. ज्यानी कुणी लिहीलंय त्याचे आभार. 🍁🍁🍁 *चिंटी चावल ले चली,* *बीच में मिल गई दाल।* *कहै कबीर दो ना मिलै,* *इक ले डाल॥* अर्थात :               मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'      तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात.               साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा म...

कर्दळीवन परिक्रमा आणि भारतीय झाडे लावा

05/04/17, 6:42 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 07/04/17, 10:19 PM - Sandesh Nayak: ☘फक्त देशी झाडे लावा.☘ ❗परदेशी झाडे पर्यावरणास घातक ❗। 👉आजकाल बहुपयोगी वड ,पिंपळ,चिंच ,फणस ,आवळा ,आंबा ,बेल,कडुनिंब ,मोह , कदंब ,पळस अशी भारतीय देशी झाडे लावायची सोडुन मॉडर्नपणाच्या खोट्या समजुतिने परदेशी कॅशिया,ग्लिरिसिडीया,फायकस ,सप्तपर्णी ,स्पॅथोडिया,रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे.पण ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले आहे. 👉परदेशी झाडांवर कधीही पक्षी🕊🕊 बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत .एकवेळ आपले पक्षी मुळ भारतीय असलेल्या रामकाटी बाभूळ या देशी झाडावर घरटे करतात पण परदेशी झाडावर करत नाहीत .( रामकाठी बाभूळ ही उंच वाढणारी पिवळी फुले येणारी मूळ देशी बाभूळ आहे ,मात्र आता सर्वत्र झुडुपासारखी वाढणारी वेडी बाभूळ ,बंगाली बाभूळ ,चिलार या नावाने ओळखली जाणारी बाभूळ परदेशी असुन १९७२ साली आयात केलेल्या गव्हा(मिलो )बरोबर भारतात आली आहे . ) 👉परदेशी झाडाची पाने ,फुले ,शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,...

माहूरची रेणुका माता।

05/04/17, 6:42 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 06/04/17, 10:46 PM - Girish Paliwal New SHS: Was wondering , can this ever come back ? *समर वेकेशन 'मेमरीज' मधून -* उशिरा उठायचं, आईच्या कामात लुडबुड करायची, उठल्या उठल्या कॅरम काढायचा, मित्र मैत्रिणींना बोलावून आणायचं, सटर फटर काहीतरी खात राहायचं, कैरीच्या फोडी पळवायच्या, मधूनच ताट भरून कलिंगडाच्या फोडी यायच्या, मग कधीतरी जमलं तर अंघोळ, मग रस काढून उरलेल्या कोयी आणि सालं चोखायची, पत्त्यांचे डाव, खाऊ, कुल्फीची घंटा, चार आण्याची कि आठ आण्याची कुल्फी आणायची ह्यावर चर्चा, कॅरम आणि पत्त्याचे उधळलेले डाव, कुणीतरी library मधून आणून दिलेली एकट्याने बसून वाचलेल्या विक्रम वेताळ, चम्पक, चाँदोबा, किशोर पुस्तकं, एक रुपया तासावर भाड्याने आणलेली सायकल, भाड्याने आणलेला व्ही.सी.आर., खराबलेल्या कॅसेट्स्, मग आत्ते मामे मावस बहिणींबरोबर एकमेकांकडे राहायला जाण्याचा plan, भीत भीत पोहोण्याच्या तलावावर जाऊन कशीबशी संपवलेली ती ४० मिनिटे, संध्याकाळी बागेत गेल्यावरचा तो भेळेतल्या कांदा ...

अविरत ओठी यावे नाव....

31/03/17, 6:53 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 04/04/17, 6:56 PM - Suhas Dhamorikar: अविरत ओठी यावे नाम श्रीराम जय राम जयजय राम रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे पतीतपावन अवघे नाम श्रीराम जय राम जयजय राम जानकीची जणु जीवनज्योती प्रभु रामाची कोमल मूर्ती मंगल दर्शन पूर्ण विराम श्रीराम जय राम जयजय राम पंचप्राण हे पवनसूताचे राम जणू नि:श्वास तयांचे तनू संजीवन सुंदर धाम श्रीराम जय राम जयजय राम गीत - मनोहर कवीश्वर शुभप्रभात/Good morning ✨✨✨☀✨✨✨ 🌳⛳🌳🌺🌳⛳🌳 05/04/17, 2:40 AM - Maya Pande Londhe SHS: ======= माय - लेक ======= रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. अंथरूणाला पाठ टेकणार, इतक्यात एकाएकी लक्षात आलं की आपण गडबड करून ठेवलीये. ऊद्या पहाटे ऊठून डबा करायचाय आणि कणिक भिजवायची राहिलीये. स्वत:वरच चरफडत बाहेर आले. स्वैपाकघरातली माझी खुडबुड ऐकून अभ्यास करत बसलेला मुलगा आत आला. - हे काय? आत्ता काय करतीयेस ? झोपायला गेली होतीस ना? - अरे, पहाटे डबा द्यायचाय अन् मी कणिकच भिजवायला विसरले. आजकाल ना मी काय काय विसरेन काही सांग...

आमरस

*आमरस* होळी झाली की पाडव्याचे आगमन होऊ लागते...आणि त्याच वेळी वेध लागतात आंब्याचे...अर्थात आमरसाचे... खर तर आमरसाची सुरुवात अक्षयतृतीयेपासून करतात पण तो पर्यंत काही कळ निघत नाही.... जीभ आणि पोट अक्षरशः बंड करू पहात... इतक्या वर्षात कोकणात बऱ्याचश्या आढी आणि वाड्यावर म्हाळसाच्या खुप ओळखी झालेल्या असल्याकारणाने तिकडून फोन/निरोप यायला सुरुवात होते.. म्हाळसाच्या बऱ्याच फोनाफोनी नंतर अगदी अस्सल आणि निवडलेल्या रसभरीत हापूस आंब्याची सिझनची पहिली पेटी घरात येते आणि पाडव्यापासून सुरु होतो आमरसाचा एक भव्यदिव्य रसभरीत सोहळा व उभे होते पुढील दोन महिन्याचे आंब्याचे अर्थात आमरसाचे महानाट्य... पेटीतले पहिले दोन आंबे देवाला प्रसाद म्हणून ठेवले की अगदी आतुरतेने वाट पहायची पाडव्याची... त्या दिवशी आमरसाचा श्रीगणेशा होतो.. त्या आधीच दोन दिवस घरात आंब्याच्या वासाचा घमघमाट असतो...बाहेरुन घरात प्रवेश केल्यावर या वासाने मन प्रफ्फुलीत होते...अश्या या वासाचे वैभव छाती फुगवून मिरवायला जाम आनंद होतो... मग येतो पाडवा...या दिवशी पहिला आमरस पुरीचा बेत... अक्षरशः एखाद्या युद्धाला जाण्याच्या आवेशात त्यावेळी आमरसावर तु...

चैत्रातील रांगोळी

31/03/17, 6:53 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 02/04/17, 7:32 PM - Sunil Bhat: ****भाऊचा धक्का एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्याच्या इतिहासाची ही सफर.... बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्याला लागली आणि दिवसभर गजबजलेला तो कोकणी माणसाचा सखा भाऊचा धक्का सुस्तावला. गेली दीडशे वर्षं अव्याहतपणे मुंबईत कोकण्यांची आणि गोवेकरांची सेवा करणाऱ्या या धक्क्याच्या प्रत्येक चिऱ्याला मग वाचा फुटली. कारण अलिबागहून आलेल्या एका नवश्रीमंत फार्महाऊसवाल्याने "ये कौन भाऊ है जी ? टर्मिनस को जिसका नाम दिया है वो ?" असे कुत्सित उद्गार काढले. गेली दीड शतकं या धक्क्यावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असत. त्यांना हा प्रश्न कधी पडला नाही. उलटअभिमान असा की, 'भाऊ' हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिलं आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे ! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मु...

एप्रिल फूल वर कविता

31/03/17, 6:53 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 01/04/17, 3:19 AM - Mohan jagdale: माह्या बायकोनंच मले एप्रिल फुल बनोलं राजेहो 🎉कानाले... खडा..!!🙄 काल माह्या वाट्स अपवर आली राजेहो... इतली ..सनान...परी...! का घंटाक भर पाह्यतच रायलो.. बायको.. नव्हतीना...घरी...!! असं वाटे गुलाबाचं नरम नरम टाकलं हाय...म्याटिंग... अन पुसुच नका गुलकंदा वानी सुरु झाली ...चाटिंग..!! म्हने, पायटी तुमी फिराले जाता.. मी रोज तुमाले पाह्यतो.. मंग सारा दिस तुम्हाले मी हरदम आठवत..राह्यतो..!! मले लयच आवडले तुमचे वाले कुरये केस उली ..उली.. फक्त तिसचीच हाव मी.. माह्य..नाव हाय.."जुली"...!! लय दिसापासून तुम्ही मनात हाय हो माह्या... तुम्हीच माह्ये गुलाब जामुंन.. बाकीचे .फुटाणे अन लाह्या!!! बम हरीख झाला मले राजेहो.. बम लागलो नाचाले..! येक येक शबुद तिचा.. दहा डाव लागलो वाचाले...!! म्हने ..घरी फकस्त बुढाच असते थ्याले बिलकुल नका भेजा..! बरोबर सहाच वाजता सख्या.. तुम्ही घरी माह्या येजा...!! अरे नाचाचच मन करे सांजीले मस्त तैयार झालो.. कइक दिवसाच्या बा...