Skip to main content

Posts

पावसाच्या नक्षत्रांचे वर्णन

गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचे बोलकं वर्णन केलं जातं. त्याच भाषेत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय, त्याच्या पाठोपाठ म्हाताराही पडून गेला आहे. आता सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल. हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.  बहुधा प्रत्येक पाऊसनक्षत्रासाठी गावाकडे स्वतंत्र म्हणी आहेत.  पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती (स्वाती नक्षत्रातला पाऊस पिकाला खर्‍या अर्थाने उभारी देतो, रूपरंग देतो. त्यामुळे या नक्षत्रात पाऊस झाला तर खर्‍या अर्थाने माणिक मोती पिकतात) पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा (चित्रा नक्षत्रातला पाऊस बिनभरवशाचा असतो. पडला तर इतका पाऊस पडतो की तो काहीच शिल्लक ठेवत नाही, अगदी वाडग्यात काढून ठेवलेलं उष्टावण असो की ताजं जेवण असो ते एकतर सादळून तरी जातं नाहीतर बेचव तरी होऊन जातं. म्हणून मग त्याची चव जाते. मग त्याचं वर्णन भात खाईना कुत्रा अशा शेलक्या शब्दात आलंय)           ,  पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. काही खेड्यात गरदाडा असा ही शब्द आढळतो. त्याचा अर्थ...

निवेदकाचे / गोष्ट सांगणार्याचे सहा गुण

माधुर्यम् अक्षरव्यक्ती: पदच्छेद: तु सुस्वर: ।  धैर्यम् लयसामर्थ्यम् च षडेते पाठका गुणा: । भाषेचा गोडवा, अक्षरांचे उच्चारण, शब्दांचा योग्य तो पदच्छेद - (योग्य ठिकाणी शब्द तोडणे, pause घेणे, जोर देणे वगैरे), सुस्वर - आवाजाचा गोडवा ,  धैर्य - धीटपणा / आत्मविश्वास, आणि लयसामर्थ्य  - योग्य तो आवाजाचा चढ उतार आणि लय (monotonous नसणे), हे पाठकाचे - म्हणजे निवेदकाचे / गोष्ट सांगणार्याचे सहा गुण असतात / असावेत.  मदन 

UNIQUE VILLAGES IN INDIA

*● UNIQUE VILLAGES IN INDIA* *● गांवांचा वेगळेपणा ......* *१)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)*     संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.     गांवात पोलीस चौकी,पोलीस ठाणे नाही.     गांवात चो-या नाहीत. *२)• शेटफळ (महाराष्ट्र*)     प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य      असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती. *३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र*)     भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे.      ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.     सर्वाधिक GDP असणारं खेडं. *४)• पनसरी (गुजरात)*     भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.     गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,     Wi-Fi सुविधाही आहेत.     गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात. *५)• जंबुर (गुजरात)*     भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक     "आफ्रिकन" वाटतात.     [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख] *६)• कुलधारा (राजस्थान)*     "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.     ...

विडा किंवा तांबूल महत्व व संबंधित कथा.

विडा किंवा तांबूल महत्व व संबंधित कथा.... ---------------- १ )तांबूल प्रदान : देवीला विडा हा आत्यंतिक प्रिय आहे. विडा हा ही रजोगुणी आहे. त्रयोदशगुणी विडा तिला आत्यंतिक प्रिय आहे. जगाच्या कल्याणासाठी तिला सत्त्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता असते. म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे. विडा, तिला प्रिय आहेत. -------------------------  २)तांबूल ऊर्फ विडा  ‘विडा’सुद्धा सर्व थरांतल्या लोकांमध्ये प्रिय आहे.   तांबूल म्हणजे कात , चुना, सुपारी इत्यादी पदार्थ घालून केलेला नागवेलीच्या पानाचा विडा. हा त्रयोदशगुणी असावा असा संकेत आहे. ते तेरा गुण म्हणजे तिखटसर, कडवट, उष्ण, मधुर, खारट व तुरट, वातहारक, कृमिनाशक, कफहारक, दुर्गंधी नाहीशी करणारा, मुखाची अशुध्दी नाहीशी करून मुखाला शोभा आणणारा, कामाग्नी उद्दीपीत करणारा...  ‘योगरत्नाकर’ ह्या ग्रंथातील एका श्लोकामध्ये हे सर्व वर्णन दिले आहे. त्यात विड्याचे घटक म्हणून पदार्थ दिले आहेत, नागवेलीची पाने, सुपारी, कात , चुना , कापूर , कस्तुरी, लवंग , जायफळ व तंबाखू . तंबाखूमुळे दंतरोग शमन होतो, तसेच कृमी व कंड नाश पावतात.   व...

वनस्पतींची निसर्गऊर्जा

वनस्पतींची निसर्गऊर्जा -                                                              रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून  ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..जंगलातल्या काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊ...

शोध बाजीराव-मस्तानीपुत्र, पानिपतवीर समशेर बहादूर यांच्या कबरीचा

*शोध बाजीराव-मस्तानीपुत्र, पानिपतवीर समशेर बहादूर यांच्या कबरीचा*     पानिपत!हिंदुस्थानच्या रक्षणासाठी लाखभर मराठ्यांनी प्राणाहुती दिलेले स्थान! मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठे युध्द,महायुद्धच! मराठ्यांच्या प्रखर राष्ट्रीय भावनेचा धगधगता अविष्कार! मराठ्यांनी हारूनही जिंकलेले युध्द!       या प्रचंड रणसंग्रामात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध मराठी सरदारांच्या, वीरांच्या समवेत लढले होते पेशवे बाजीराव आणि मस्तानी यांचे पुत्र समशेर बहादूर. प्राणांतिक जखमांनी घायाळ झालेल्या समशेर बहादूरांनी अखेरचा श्वास घेतला तो भरतपूरमधे.याच समशेर बहादूरांच्या कबरीचा शोध मला कसा लागला त्याची हकीकत या लेखात नमूद करीत आहे.      महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यातील शिवरायांचे किल्ले पाहण्याच्या प्राथमिक उद्देशाने  १९९० मधे सुरु झालेली माझी दुर्गदर्शन यात्रा पुढे खूप विस्तारत गेली.इतिहास घडविणाऱ्या मराठी वीरांच्या समाधीस्थळांचे दर्शन आणि शोध हा महत्वाचा विषय या यात्रेत समाविष्ट झाला.२००६ पर्यंत जवळपास तीनशे किल्ले पाहिले आणि शंभराहून अधिक महत्वाच्या मराठी वीरांच्या समाधीस्थळां...

मधुमालती

#मधुमालती 🌸🌿🌸🌿 नावातच मधु असलेली आणि उसाच्या पेरांपेरांत साखर भरलेली असते तशी देठादेठांत मध भरलेली ही मालतीची फुलं आपल्यालाच काय तर काळ्या मुंग्यांनाही माहित असतात.😁त्याशिवाय का त्या दिवसभर फुलांच्या आत बाहेर करत मध गोळा करतात?😛म्हणजे नावात काय आहे असं विचारणा-यांनाही कळेल की मधुमालतीची वेल आणि तिच्यावर येणारी फुलं हे प्रकरण किती गोड आहे ते !☺ही मधु आणि मालतीची जोडी पूर्वी लग्नात नाव ठेवतानाही आढळायची.म्हणजे नव-याचं नाव मधुकर किंवा मधुसूदन असेल तर बायकोचं नाव बदलताना त्याला हमखास मालतीच सुचवलं जायचं 😜 इतकी ही जोडी फेमस होती.मी पाचवीत रोह्याला असताना बाबांच्या एका मित्राकडे जाऊन "मधुकाका...उद्या संध्याकाळी आमच्या घरी हळदीकु़ंकवाला मालतीकाकूंना पाठवा" असं बेधडक निमंत्रण दिलं होतं.मग काकांनी हसत हसत सांगितलं की नक्की पाठवतो पण काकूचं नाव मोहिनी आहे ! 🙈म्हणजे तिथे नियमाला अपवाद होता.🤗हिचं नावच इतकं गोड आहे की सिंहासन बत्तिशी लिहितानाही नवव्या पुतळीचं नाव मधुमालती ठेवण्याचा मोह लेखकाला आवरता आला नाही ! तर अशी ही मधुमालती ही भारतीय वंशाची सदाहरित वेलवर्गीय वनस्पती.#कॉम्ब्र...

शरीरी वसे रामायण

|| *शरीरी वसे रामायण* || जाणतो ना कांही आपण शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ || आत्मा म्हणजे रामच केवळ, मन म्हणजे हो सीता निर्मळ ! जागरुकता हा तर लक्ष्मण, शरीरी आपुल्या वसे रामायण ||१|| श्वास, प्राण हा मारुतराया, फिरतो जगवित आपुली काया | या आत्म्याचे करीतो रक्षण शरीरी आपुल्या वसे रामायण ||२|| नील जाम्बुवंत रक्त नसा या, फिरती शोधत जनक तनया गर्वच म्हणजे असतो रावण शरीरी आपुल्या वसे रामायण ||३|| रक्त पेशी त्या सुग्रीव, वानर, भाव भावना त्यातील वावर मोहांधता करी आरोग्य भक्षण शरीरी आपुल्या वसे रामायण ||४|| नखें केंस त्वचा शरीरावरती, शरीर नगरीचे रक्षण करती बंधु खरे हे करती राखण शरीरी आपुल्या वसे रामायण ||५|| क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो, शांत असता घोरत पडतो डिवचताच त्या करी रणक्रंदन शरीरी आपुल्या वसे रामायण ||६|| गर्वे हरले सौख्य मनाचे कांसाविस हो जीवन आमुचे संकटी येई शरीर एकवटून शरीरी आपुल्या वसे रामायण ||७|| मनन करता भगवंताचे, रक्षण होईल आरोग्याचे राम जपाचे अखंड चिंतन शरीरी आपुल्या वसे रामायण ||८|| ||  *श्रीरामार्पणमस्तु*  ||🙏🏻

साबुदाणा खिचडी

*साबुदाणा  खिचडी*                                  *पोर्तुगीज भारतात आले म्हणून आपल्या उपवासाची सोय झाली*  आपल्या पैकी अनेकांनी उपवास केला असेलच.  बऱ्याचजणांनी श्रद्धेपोटी केलाय  तर  काहीजणांनी फक्त साबुदाण्याची खिचडी खायला मिळावी  म्हणूनच उपवास केलाय.  आज सगळ्यांच्या डब्ब्यात खिचडी हमखास आढळते. साबुदाण्याची खिचडी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय उपवासाचा पदार्थ.  पण याचा आणि उपवासाचा काय संबंध हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय काय? साबूदाणा खिचडीचा  इतिहास आपण जाणूनच घेतला नाही. भगवान भोलेनाथ शंकराचा वाढदिवस होता. माता पार्वतीने सगळी तयारी केली पण गणपतीने ते सगळ जेवण संपवलं. भगवान शंकराना उपवास घडला. पार्वती देवीनी आयडिया केली. झटपट साबुदाने भिजत घातले आणि त्याची मस्त खिचडी बनवली. भोलेनाथाला ती खिचडी आवडली तेव्हा पासून त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे माझ्या प्रत्येक वाढदिवसाला जो कोणी भक्त उपवास करेल आणि साबुदाणा खिचडी खाईल त्याच्यावर मी प्रसन्न होईन. सॉरी बॉस.  ...

ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा

शिव आणि पार्वती हे दैवतांचे युगुल मोठे अद्भुत आहे. ते आम्हा माणसांसारखेच एकमेकांवर अतिशय उत्कट प्रेम करतात, एकमेकांसवे सारीपाट खेळतात, तो प्राप्त व्हावा म्हणून ती एक पान फक्त खाऊन तप करते अपर्णा होते.  रात्री आकाशमार्गे विहार करताना कुणा दीनदुबळ्या माणसांची दुःखे पाहून तिला दया यावी अन त्याने तात्काळ वर देऊन माणसांना दुःखमुक्त करावे. तो तिच्या यज्ञप्रवेशानंतर क्रोधाने बेभान तांडव करतो. ती असताना तर तो तिच्यात प्रेमात इतका मग्न असतो की त्याची आरती करताना समर्थ रामदास  " ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा " अशी गुलाबी ओळ लिहितात.  कुणा अनाम शिल्पकाराने या दैवि युगुलाच नातं आपल्या कल्पनाशक्तीने पाषाणात कस उतरवलय ते या फोटोत पहा. अमृतमंथनात वासुकी नागाच्या मुखातून हलाहल विष बाहेर पडलय, ते कोण स्वीकार करणार ? विश्वाच्या कल्याणासाठी  कर्पूरगौरम् करूणावतारम् असा भगवान शिवशंकर ते हलहल प्राशन करतो विषाच्या प्रभावाने कंठ काळानिळा होतो. शिल्पकाराने या मूर्तीत आजवर मी कुठेच न वाचलेली पुढची कथा पाषाणात कोरली आहे. महादेवाच्या बाजूला सखीपार्वती उभी आहे. तिने आपला हात त्या नीलकंठ महादेवाच्य...

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ?

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास) पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ...

Incredible India.

#काशीराजकालीमंदिर,वाराणसी .उत्तर प्रदेश के लकड़ी पर नहीं, बल्कि पत्थर पर की गई नक्काशी है। पौराणिक #हिंदूमंदिरों में ऐसी उत्कृष्ट कलाकृतियों का खजाना है जो किसी भी अजूबे से कम नहीं लेकिन पता नही क्यो इन कलाकृतियों को वह पहचान नहीं मिली ?? #अतुल्यभारत #सनातन_धर्म #indianculture #indiancultures  #incredibleindia #hinduism #temple #Kashirajkali Temple,. Varanasi. Uttar Pradesh is not carving on wood, but on stone Mythological #Hindu Mandirs have a treasure of excellent artworks that are no less than any wonder. But I don't know why these artworks didn't get that recognition?? #अतुल्यभारत #सनातन_धर्म #indianculture #indiancultures  #incredibleindia #hinduism #temple

पंढरपूरची_भोपळ्याची_शेती

पंढरपूरची_भोपळ्याची_शेती          सतार व तंबो‍ऱ्याची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे भोपळे लागतात.‘ही दोन्ही वाद्ये तयार करण्यासाठी वापरला जाणारा भोपळा दर्जेदार असतो. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात भीमा, चंद्रभागेच्या तीरावरच्या वाळवंटी जमिनीत पिकवले जातात. हे भोपळे चवीला अत्यंत कडू असतात. नदीच्या काठावर काही मोजक्या गावांमध्ये या भोपळ्याचे पीक घेतले जाते. तेथील विशिष्ट हवामान, माती यामुळे हे भोपळे वजनाने हलके आणि बाहेरून टणक तयार होतात. त्यामुळे त्यातून मधुर सूर निर्माण होतो.         भोपळ्याच्या एका बीपासून सतारीपर्यंतचा प्रवास खूपच दिलचस्प असाच म्हणावा लागेल. सतारीसाठी जो भोपळा वापरला जातो तो मूळचा आफ्रिकेतला. आफ्रिकेतल्या आदिवासी जमाती याचा वापर मध, दारू, पाणी साठवून ठेवण्यासाठी करत. कालांतरानं इतर गोष्टींसारखाच तो भारतात पोहोचला. पंढरपूर जिल्हामध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. हा भोपळा वाढण्यासाठी आणि चांगला वाळण्यासाठी कोरडी जमीन आणि उष्ण वातावरण लागतं. चंद्रभागेच्या काठावरच्या बेगमपूर, सिद्धापूर या खेड्यांमध्ये याची प...

Chain carved in stone

The chain depicted in the picture is so realistic, but it is not of iron or any metal ; rather is carved in stone. The noteworthy point is... That when a such a chain is made of iron... All the rings are made separately and then fitted together... Though, if needed... the rings can again be pulled apart to open. ( In some cases welding may be done to avoid opening of the rings , but usually the rings CAN OPEN !!) Here... The CHAIN IS ENTIRETY CARVED IN STONE, SO HOW WERE THE RINGS FITTED TOGETHER TO FORM THE CHAIN ??!! I mean... at times... The spellbounding talent of the Hindu ancestors leaves one BEWILDERED & pleasantly AMAZED !! Also... Dumbfounded..

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...

अबय / पठारीच्या शेंगा

#अबईच्या_शेंगांची_भाजी 😋 ( अबय / पठारीच्या शेंगा) काल बाजारातल्या भाजीवाल्या मामीकडे जरा डोकावलो ... काय गो ? पालाभाजी सोडून काय हा ?? ह्या काय , करांदे कणगरा लालमाट सुरन नी अबयच्या शेंगांचो एक वाटो हा ... पाऊस जाऊन महिनो लोटलो , अजून खयची अबय ? जल्ली जगलेय एक बांदावर, पानी गावताय ना भाजीचा , फोफावलेय नुसती, देव काय ? दे वाईच, ह्या साली जाम रानभाज्या खाल्लंय, कोरोनाची कृपा ... कुसला नाव त्या कोरोनाचा, मेल्यान् नकोसा जीव केलानाय, जायचा नाव घेत नाय... जाईल गो जाईल, तो वरनं बगताय ना ... व्हय तर , ही घे अबय ... अशा नेहमीच्या संवादानंतर अबयच्या शेंगा घरी आल्या... खरं तर ही पावसाळी रानभाजी, पण पाणी मिळालं तर थंडीतही तग धरते नी पार उन्हाळ्यापर्यंत शेंगा देते... फरसबीच्या कुटुंबातली ही वेलवर्गीय वनस्पती. कोवळ्या शेंगांची सुंदर भाजी होते. शेंग मोडून चिरुन , दोर काढून शिजवायची नी मग कांद्यावर परता, पीठ पेरा, वाटण लावा नाहीतर भिजलेल्या चणाडाळीशी सूत जुळवा, अबय सगळ्यांबरोबर रमते नी उत्कृष्ट चवीची औषधी भाजी पोटात जाते ... आज कांद्यावर परतून पीठ पेरुन केलेली ही अबयची भाजी ... ©स्वानंद ज...

गगनजाई

#गगनजाई... 🌸🌸🌸 जाईच्या फुलांसारख्या पांढ-या रंगांची आणि जाईपेक्षा अधिक सुगंधी अशी ही आकाशाकडे झेपावणारी झाडं  म्हणून त्यांचं नाव #गगनजाई.निंबाच्या पानांसारखी पानं म्हणून दुसरं नाव #आकाशनिंब.तर याच्या खोडापासून काचेच्या बाटल्यांची बुचं बनवतात म्हणून तिसरं अगदी अरसिक आणि जास्त वापरातलं नाव म्हणजे #बुचाचं झाड.🙄लहानपणी घरापासून शाळेत जाताना वाटेत या फुलांचा सडा पडलेला असायचा.आम्हा मैत्रिणींच्यात का कोण जाणे पण या फुलांना पाटलिणीची फुलं असं नाव होतं.कदाचित त्या झाडांची मालकीण कोणीतरी पाटील आडनावाची बाई असावी.सकाळी सकाळी रस्त्यावरुन चालताना या फुलांचा सुगंध दरवळत नाकाशी आला की आपसुकच दोन्ही मुठीत मावतील इतकी फुलं गोळा करायची.सुट्टीच्या दिवशी वेचून घरी नेली की आई बोटांवर वळून त्याची छान वेणी करायची.इतर दिवशी शाळेत मैत्रीणींना वाटायची.त्याचे छोटे छोटे गुच्छ करुन वेणीत घालायचे.दुपारनंतर ती फुलं मऊ व्हायची.मग अलगद केसातून काढून पुढचा उद्योग सुरु व्हायचा.या पांढ-या शुभ्र किंवा किंचित गुलाबी छटा असलेल्या फुलांना पाच पाकळ्या असायच्या.तीन पाकळ्या स्वतंत्र तर चौथी आणि पाचवी एकमेकींना जुळ्या ब...

जडगांवच्या वांग्याचे भरीत पुराण

🧄🧅जडगांवच्या वांग्याचे भरीत पुराण🧄🧅 डिसेंबर, जानेवारी महिन्यात तुम्ही कधी *जळगावला* गेलात  आणि भरताची चव न चाखताच परत गेलात, तर तुमची फेरी वाया गेली म्हणून समजा. तुमचे नातलग, मित्र *जळगावी* राहत असतील आणि त्यांनी तुमच्या पाहुणचारासाठी *बामणोद हून* आणलेल्या वांग्यांचे, आसोद्याच्या माणसाने तयार केलेल्या भरताचे जेवण ठेवले नाही, तर तुमच्या नातलगांचे, मित्राचे तुमच्यावर खरे प्रेम नाहीच, याची तुम्ही खूणगाठ बांधायला हरकत नाही. जळगावला येऊनही इथले भरीत खाऊ घालत नाही म्हणजे काय?  *जळगावातली भरताची पांढरी, हिरवी वांगी आणि त्यांचे विशिष्ट पद्धतीने केलेले भरीत ही चीजच आहे तशी. वातावरणात थंडी असताना एखाद्या शेतात भरीत पार्टीला उपस्थित राहणे, हा इथे उत्सव असतो. अंगाला झोंबणारी थंडी, समोर केळीचे पान, त्यावर गरम गरम भरीत, शेजारी तशीच कळण्याची गरम गरम भाकरी, मुळ्याच्या फोडी आणि तोंडी लावायला दही घातलेली टोमॅटोची कोशिंबीर. आहाहाहा! असल्या पार्टीच्या आठवणीनेही अस्सल *जळगावकर* कासावीस होतो. परवा सहज इंटरनेटवर *‘भरीत’* असा शब्द टाइप करून सर्च करण्याचा प्रयत्न केला तर *‘खान्देशी भरीत’* सर्व जगभ...

तुळशीचे लग्न

🏵🌻🌺🙏🏼🌺🌻🏵 🌿 *तुळशीचे लग्न* 🌿 ✨✨✨✨✨✨✨ तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे, देव व दैत्य यांच्यांत युध्द होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली. विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली. इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजे...

दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र ठाऊक आहे का?

दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र ठाऊक आहे का? ...म्हणून दिवाळीत बनवले जातात करंजी, चकली, चिवडा अन् लाडू लोकसत्ता ऑनलाइन | – वैद्य हरीश पाटणकर  नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते! आदिती दिवाळीच्या सुट्टीला गावी गेली होती. गावी सगळीकडे दिवाळीचे फराळ बनविण्याची गडबड चालू होती. सगळे जण आपापल्या कामात व्यग्र होते. आदितीच्या डोक्यात मात्र भलतेच चालू होते.. आई, मामा, आत्या सर्वाना प्रश्न विचारून विचारून तिने अगदी भंडावून सोडले होते. शंकरपाळीचा आकार असाच कसा? करंज्या अशा कशा दिसतात? लाडू गोलच का करतात? प्रत्येक फराळाचा आकार वेगवेगळा का असतो? आणि त्या छोटा भीमला जो लाडू आवडतो तो हाच का? तिच्या या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. मामाला थोडंफार य...